Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! सभापतीपदी महेश गाडे तर उपसभापतीपदी सुषमा जाधव यांची निवड

सातारा पंचायत समितीवर भाजपने बाजी मारली आहे. या विजयानंतर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे सदस्य महेश गाडे यांची निवड झाली असून उपसभापतीपदी सुषमा जाधव यांची निवड झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 16, 2026 | 09:51 PM
सातारा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!

सातारा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!

Follow Us
Close
Follow Us:
  • सातारा पंचायत समितीवर भाजप ठरला नंबर 1 पक्ष
  • पंचायत समितीच्या सभापतीपदी महेश गाडेंची निवड
  • सुषमा जाधव यांना मिळेले उपसभापतीपद
सातारा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारत पंचायत समितीवर सत्ता काबीज केली. सभापतीपदी कोंडवे गणातील भाजपचे सदस्य महेश गाडे विजयी झाले, तर उपसभापतीपदी अतीत गणातील भाजपच्या सुषमा जाधव यांची निवड झाली. या निकालामुळे सातारा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

निवडीनंतर नूतन सभापती महेश गाडे व उपसभापती सुषमा जाधव यांचा भाजप नेते, व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोमवारी (दि. १६) सातारा पंचायत समितीच्या सभागृहात सातारा पंचायत समितीसाठी सभापती व उपसभापती निवडणूक बैठक पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी आशिष बारकूल यांनी काम पाहिले, त्यांना तहसीलदार समीर यादव व गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी सहकार्य केले. यावेळी सातारा पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांची उपस्थिती होती.

Ahilyanagar News: पोहण्यास गेलेला युवक दोन दिवसांनंतरही बेपत्ताच, संतप्त नातेवाईक महिलांच्या पाण्यात उड्या

प्रारंभी सकाळी अकरा वाजता भाजपच्यावतीने सभापती पदासाठी कोंडवे गणातील महेश गाडे यांनी तर उपसभापती
पदासाठी अतित गणातील सौ. सुषमा जाधव यांनी अर्ज भरला. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी व इतर विरोधी पक्ष सदस्यांच्यावतीने राहुल कापले व स्वप्नाली फडतरे यांनी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान, सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत कोंडवे गणातील भाजपचे सदस्य महेश गाडे यांच्या बाजूने १० मते पडली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल कापले यांना ६ मते मिळाली. त्यामुळे महेश गाडे यांनी बहुमत मिळवत सभापतीपदावर विजय मिळवला. तसेच, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अतीत गणातील भाजपच्या सुषमा जाधव यांच्या बाजूनेही १० मते पडली. तर वर्णे गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वप्नाली फडतरे यांना ६ मते मिळाली. त्यामुळे सुषमा जाधव यांनी उपसभापतीपदाची निवडणूक जिंकत भाजपची सत्ता अधिक मजबूत केली. या निकालामुळे सातारा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“महाराष्ट्रात 80 टक्के पाऊस होईल, असे गृहीत…”; ‘पाणी फाउंडेशन’च्या बैठकीत काय म्हणाले Devendra Fadnavis?

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच समर्थक व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच गुलाल उधळत विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महेश गाडे आणि सुषमा जाधव यांचे अभिनंदन केले.

Web Title: Satara panchayat samiti bjp wins mahesh gade chairman sushma jadhav deputy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: नेवासे तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी 51 कोटीचा निधी मंजूर, आमदार विठ्ठलराव लंघे यांची माहिती
1

Ahilyanagar News: नेवासे तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी 51 कोटीचा निधी मंजूर, आमदार विठ्ठलराव लंघे यांची माहिती

Ahilyanagar News: एकाही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू नका! पालकमंत्री विखे पाटलांचे 100 टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
2

Ahilyanagar News: एकाही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू नका! पालकमंत्री विखे पाटलांचे 100 टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

Baramati News : बारामतीमध्ये उडणार भडका, सुनेत्रा पवारांच्या विरोधात मोर्चेबांधणी
3

Baramati News : बारामतीमध्ये उडणार भडका, सुनेत्रा पवारांच्या विरोधात मोर्चेबांधणी

सरकारचा मोठा निर्णय! Gold खरेदीचे नियम बदलणार;  ग्राहकांना घ्यावी लागणार ‘या’ गोष्टींची काळजी…
4

सरकारचा मोठा निर्णय! Gold खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांना घ्यावी लागणार ‘या’ गोष्टींची काळजी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.