Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara: पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणामुळे नागरिक संतप्त, सदर बाजारातील रहिवाशांचा नगरपालिकेत ठिय्या; तातडीच्या कारवाईची मागणी

साताऱ्यातील सदर बाजार परिसरातील पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सर्वेक्षणाचे आदेश देत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 04, 2026 | 05:01 PM
Satara: पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणामुळे नागरिक संतप्त, सदर बाजारातील रहिवाशांचा नगरपालिकेत ठिय्या; तातडीच्या कारवाईची मागणी
Follow Us
Follow Us:

 

  • पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणामुळे नागरिक संतप्त
  • सदर बाजारातील रहिवाशांचा नगरपालिकेत ठिय्या
  • तातडीच्या कारवाईची मागणी
सातारा, दि. ४ (प्रतिनिधी): सदर बाजार परिसरातील नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावरून स्थानिक नागरिकांनी गुरुवारी नगरपालिकेत धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांनी नगराध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत आपला निषेध नोंदवला.

सर्वे क्रमांक २४६ ते २४८ परिसरातील रहिवाशांच्या मते, पालिकेच्या खुल्या जागेवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यामुळे परिसराच्या नियोजनबद्ध विकासावर परिणाम होत आहे. याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली.

देवराज कामाठी, महेश कामाठी, राजेंद्र भोसले, महेंद्र भोसले, मालन भोसले, रवींद्र कामाठी, सारिका भोसले यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. अतिक्रमणामुळे त्यांच्या घरांकडे जाणाऱ्या मार्गावर अडथळे निर्माण झाले असून दैनंदिन वाहतूक व अन्य सोयी-सुविधांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘युवकांच्या हाताला काम मिळणे हीच आजची सर्वात मोठी गरज’; देगाव येथील रोजगार मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्यानंतरही त्यांनी मूळ जागांवरील अतिक्रमण कायम ठेवले असून सार्वजनिक जागेवरही अतिक्रमण वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगराध्यक्ष अमोल मोहिते हे शहराबाहेर असल्याने आंदोलकांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांची भेट घेतली. यावेळी जळक यांनी संबंधित जागेची पाहणी व सर्वेक्षण करून वस्तुस्थितीची पडताळणी केली जाईल तसेच नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

पालिकेची जागा अतिक्रमणमुक्त करून परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली असून प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सातारकरांनो, लक्ष द्या! जिल्ह्यात चित्रपटसृष्टी उभारण्याचे स्वप्न होणार पूर्ण! मेघराज राजे भोसले यांचे प्रयत्न

Web Title: Satara sadar bazar residents protest at municipal council against illegal encroachment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Local News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा
1

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
2

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
3

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
4

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.