Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Maharashtra Drought 2026: सातारा जिल्ह्यातील पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 29, 2026 | 04:10 PM
पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यातील पाच तालुक्यांसाठी शंभूराज देसाई मैदानात
  • दुष्काळी समावेशासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
  • पाटणसह पाच तालुक्यांना दुष्काळी मदतीची प्रतीक्षा
 

मुंबई: सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव या तालुक्यांचा दुष्काळी क्षेत्रात समावेश करून शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात दुष्काळ जाहीर

राज्यात दुष्काळ जाहीर करताना सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा आणि महाबळेश्वर आदी तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पाटणसह वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव या तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश झालेला नाही. दरम्यान, या तालुक्यांमध्येही पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतीपिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यांचा दुष्काळी क्षेत्रात समावेश करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे.

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये शिक्षिके Digital Arrest ची भीती दाखवली अन्…; शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

पाटण तालुक्यातील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे देसाई यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तालुक्यात एकूण १४ महसूल मंडळे असून त्यापैकी नऊ महसूल मंडळांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित पाच महसूल मंडळांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पावसाच्या खंडामुळे शेतीपिकांचे नुकसान

पाटणप्रमाणेच वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव तालुक्यांमध्येही पावसाच्या खंडामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता पावसाच्या खंडाचा पिकांवर झालेला प्रत्यक्ष परिणाम लक्षात घेऊन दुष्काळी निकषांनुसार या तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळावा, यासाठी देसाई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ही बाब मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने या मागणीवर शासनस्तरावर पुढील कार्यवाहीला वेग येण्याची अपेक्षा आहे. सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांबाबतही दुष्काळी निकषांच्या आधारे निर्णय होण्याची प्रक्रिया आता महत्त्वाची ठरणार आहे.

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Web Title: Satara shambhuraj desai demands drought status for patan and five talukas maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Satara
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
1

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
2

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप
3

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
4

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.