Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Water Crisis: साताऱ्यात पाण्याच्या थेंबासाठी रास्ता रोको! दोन दिवसांपासून पाणी बंद असल्याने नागरिक आक्रमक

Satara Water Crisis News: साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेत पाणी टंचाईमुळे नागरिकांचा रास्ता रोको! दोन दिवसांपासून पाणी बंद असल्याने महिला रस्त्यावर; पालिकेकडून नवीन बॉल व्हॉल्व बसवण्याचे आश्वासन.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 04, 2026 | 07:29 PM
Satara Water Crisis: साताऱ्यात पाण्याच्या थेंबासाठी रास्ता रोको!

Satara Water Crisis: साताऱ्यात पाण्याच्या थेंबासाठी रास्ता रोको!

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात पाण्याच्या थेंबासाठी रास्ता रोको!
  • दोन दिवसांपासून पाणी बंद असल्याने नागरिक आक्रमक
  • पालिकेकडून अखेर उपाययोजनांचे आश्वासन
सातारा, दि. ४ (प्रतिनिधी): गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने होत असलेला आणि मागील दोन दिवसांपासून पूर्णपणे खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेच्या पोरे बोळ परिसरातील नागरिकांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. महिलांनी पाण्याची रिकामी भांडी रस्त्यावर मांडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे राजवाड्याकडून बोगद्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली.

आंदोलनाची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी आंदोलन सुरूच ठेवले. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रभागाचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संदीप सावंत यांनीही पाहणी करून गणेश टाकीकडील उताराच्या भागात नवीन बॉल व्हॉल्व बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली. या आश्वासनानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

Satara News: राष्ट्रवादीकडून भाजप सदस्याची अडवणूक!; कोरेगाव पंचायत समितीत निधी वाटपावरून रणकंदन

पालिकेच्या माहितीनुसार, पोरे बोळ परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. यापूर्वी व्हॉल्व दुरुस्त करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, कास योजनेतील पाणीपुरवठ्यातील अडथळे, वीज नियमनामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी तसेच गणेश टाकीला अपुरा पाणीपुरवठा यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली.

याशिवाय, विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहिमेमुळे काही कर्मचारी त्या कामात व्यस्त असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या तांत्रिक पथकावर ताण वाढला असून तक्रारींच्या निवारणास विलंब झाल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, परिसरातील काही नागरिक निळ्या पाणीवाहिनीला थेट विजेच्या मोटारी जोडून पाणी उपसत असल्याची तक्रारही पुढे आली आहे. त्यामुळे इतर भागांतील नागरिकांना कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करून समान पाणीवाटप सुनिश्चित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयात रॅम्प नसल्याची तक्रार; साताऱ्यात दिव्यांग बांधव आक्रमक

Web Title: Satara yadogopal peth water crisis rasta roko movement marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
2

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.