Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : ग्राहकांच्या संमतीशिवाय लावले जातायेत ‘स्मार्ट मीटर’; अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक

साताऱ्यामध्ये ग्राहकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात आहे. ग्राहकांची ही फसवणूक केली असून या विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 11, 2026 | 02:24 PM
All India Consumer Panchayat submits letter to District Collector for forced installation of smart meters in Satara

All India Consumer Panchayat submits letter to District Collector for forced installation of smart meters in Satara

Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट मीटर बसवण्यावरुन ग्राहकांची फसवणूक
  • सक्तीचे नसताना ग्राहकांवर वितरकांची जबरदस्ती
  • अखिल भारतीय ग्राहक पंचायतची आक्रमक भूमिका
Satara News : सातारा : सातारा जिल्ह्यात वीज ग्राहकांची पूर्वसंमती न घेता ‘स्मार्ट मीटर’ (smart meter) बसवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे ग्राहकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ग्राहकांची ही फसवणूक असून या विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात संघटनेचे सातारा (Satara News) तालुका अध्यक्ष राहुल अनिल शिवनामे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदवला आहे.

ग्राहक पंचायतीने दिलेल्या निवेदनात अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. यामध्ये कोणतेही नवीन तांत्रिक उपकरण बसवताना ग्राहकाची परवानगी आवश्यक असते, मात्र सातारा जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून मीटर बसवले जात आहेत. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत, त्यामुळे या मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वीज कपात आणि आर्थिक नुकसान: स्मार्ट मीटरमुळे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन बंद केले जात आहे. यामुळे ग्राहकांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

हे देखील वाचा : अविश्वास ठरावावर लोकसभेत जोरदार चर्चा; राहुल गांधींनी केले ‘हे’ गंभीर आरोप

स्मार्ट मीटरद्वारे घरातील वीज वापराचा डेटा सतत कंपनीकडे जात असल्याने ग्राहकांच्या खासगी माहितीच्या (Privacy) सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यामध्ये नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर हे ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले असतानाही, प्रशासनाकडून त्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल सदर पत्रात विचारण्यात आला आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस यंत्रणा अद्याप उपलब्ध नाही. जर सातारा जिल्ह्यात प्रशासनाने ही सक्ती थांबवली नाही, तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष श्री. राहुल शिवनामे यांनी दिला आहे.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष श्री राहुल अनिल शिवनामे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत कार्यकारणी सदस्य श्री जयदीप ठुसे श्री प्रवीण शहाणे, श्री संजय यादव, श्री विक्रम बोराटे, श्री गौरव कासट श्री रमाकांत शालगर आणि पदाधिकारी उपस्थित होते.या निवेदनामुळे आता जिल्हा प्रशासन आणि वीज वितरण कंपनी काय भूमिका घेते, याकडे सर्व सातारकरांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : ”नाल्यातून गॅस निर्मिती अन् पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग…! गॅस तुटवड्यावरुन खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र

Web Title: All india consumer panchayat submits letter to district collector for forced installation of smart meters in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • smart meter

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.