Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला कायदेशीर आव्हान! प्रियाताई शिंदे यांच्या ‘ओबीसी’ प्रमाणपत्रावर आक्षेप; जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे यांच्या कुणबी प्रमाणपत्रावर कायदेशीर आक्षेप घेण्यात आला आहे. ९६ हजार कोटींच्या थकबाकीनंतर आता हा नवा राजकीय वाद.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 08, 2026 | 06:49 PM
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला कायदेशीर आव्हान! प्रियाताई शिंदे यांच्या 'ओबीसी' प्रमाणपत्रावर आक्षेप

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला कायदेशीर आव्हान! प्रियाताई शिंदे यांच्या 'ओबीसी' प्रमाणपत्रावर आक्षेप

Follow Us
Close
Follow Us:

 

  • जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला कायदेशीर आव्हान!
  • प्रियाताई शिंदे यांच्या ‘ओबीसी’ प्रमाणपत्रावर आक्षेप
  • जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ
सातारा दि. ८ (प्रतिनिधी): सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या प्रियाताई शिंदे यांच्या कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्रावर आक्षेप घेत कायदेशीर आव्हान दिल्याने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. संतोष साळुंखे व जयदीप मगर यांनी एडवोकेट दत्तात्रय घोडके यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, जात पडताळणी प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

तक्रारदारांच्या मते, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेले कुणबी प्रमाणपत्र अत्यंत अल्प कालावधीत देण्यात आले. या प्रक्रियेत संबंधित महसूल यंत्रणेने नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण सध्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असतानाच या प्रमाणपत्राला मान्यता देणे चुकीचे ठरेल, अशी ठाम भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे. यामुळे प्रश्न केवळ प्रमाणपत्राच्या वैधतेपुरता राहत नाही, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले जात आहे. “जलदगतीने प्रमाणपत्र देणे म्हणजे नियमबाह्य निर्णयाला वैधतेचा मुलामा देणे का?” असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, 20 मार्च रोजी झालेल्या निवडीत प्रियाताई शिंदे अध्यक्षपदी, तर राजू भोसले उपाध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र या निवडीदरम्यान भारतीय जनता पक्षाने राजकीय डावपेचांचा वापर केल्याच्या चर्चा आधीपासूनच रंगत होत्या. आता त्यात कायदेशीर वादाची भर पडल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.

Satara News: राज्यातील कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची थकबाकी प्रलंबित, साताऱ्यातील कंत्राटदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा वाद पुढे दोन पातळ्यांवर परिणाम करू शकतो. एक म्हणजे, जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र अमान्य केल्यास अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. आणि दुसरे म्हणजे, या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेमधील सत्तासंतुलन पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे.

एकीकडे भाजपवर “दबावतंत्र” वापरल्याचे आरोप होत असताना, दुसरीकडे विरोधकांना या प्रकरणातून राजकीय संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा वाद केवळ कायदेशीर चौकटीत न राहता आगामी स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आता सर्वांची नजर जात पडताळणी समितीच्या निर्णयाकडे लागली आहे. तोपर्यंत, प्रियाताई शिंदे यांचे अध्यक्षपद हे राजकीयदृष्ट्या ‘स्थिर’ असले तरी कायदेशीरदृष्ट्या ‘अस्थिर’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप

Web Title: Satara zp president priyatai shinde caste certificate legal challenge updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • obc
  • Satara
  • Satara Politics
  • Satara ZP Election

संबंधित बातम्या

वाईतील लघु कुंभमेळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कृष्णाघाट परिसर भक्तिमय
1

वाईतील लघु कुंभमेळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कृष्णाघाट परिसर भक्तिमय

Satara News: भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी “अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा”
2

Satara News: भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी “अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा”

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Chhatrapati Shivaji Museum : छत्रपती शिवाजी संग्रहालयात दुर्मिळ वीरगळींची उपेक्षा? तळघरात धूळ-ओलाव्यात ऐतिहासिक ठेवा
4

Chhatrapati Shivaji Museum : छत्रपती शिवाजी संग्रहालयात दुर्मिळ वीरगळींची उपेक्षा? तळघरात धूळ-ओलाव्यात ऐतिहासिक ठेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.