Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yuzvendra Chahal : क्रिकेटच्या मैदानानंतर युझवेंद्र चहलची राजकीय इनिंग सुरू! BJP मध्ये प्रवेश करताच मिळाली मोठी जबाबदारी

Yuzvendra Chahal Join BJP gets role OBC Morcha committee: युझवेंद्र चहलने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राजकारणात प्रवेश करताच चहलला एक मोठी जबाबदारी देखील देण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 22, 2026 | 02:40 PM
Yuzvendra Chahal Join BJP

Yuzvendra Chahal Join BJP

Follow Us
Follow Us:
  • युझवेंद्र चहलची राजकारणात एन्ट्री
  • भाजपमध्ये केला प्रवेश
  • भाजपच्या राष्ट्रीय OBC मोर्चात नियुक्ती
Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेट संघाचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहलने आपल्या राजकीय कारकिर्दीची घोषणा केली आहे. शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी युझवेंद्र चहलने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपने त्याला विशेष इनवायटी म्हणजेच निमंत्रित  म्हणून राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या कार्यकारी समितीवर नियुक्त केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय संघात होणाऱ्या व्यापक नियुक्त्यांचा एक भाग म्हणून ही नियुक्ती केली आहे. चहलच्या क्रिकेटमधून राजकारणातील प्रवेशामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

IND vs NZ: किवींच्या घरात टीम इंडियाचा धुमाकूळ! पहिल्या डावात ठोकल्या ७२० धावा; कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ महारेकॉर्ड

युझवेंद्र चहलचा भाजपामध्ये प्रवेश

भारतीय जनता पक्षाने आपली संघटना मजबूत आणि संघटित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर मोठ्या संख्येने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आघाडीच्या नियुक्त्यांमध्ये लेग-स्पिनर युझवेंद्र चहलच्या नावाची घोषणा केली. नावाची घोषणा होण्यापूर्वी चहलने आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अमर पाल मौर्य यांची भेट घेतली होती. युझवेंद्र चहलच्या व्यतिरिक्त, भाजपने इतर मागासवर्गीय आघाडीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे.

आसामचे जोगेन मोहन, ओडिशाच्या ममता मोहंता, उत्तर प्रदेशचे संगम लाल गुप्ता, महाराष्ट्राचे बाबनराव रावजी चौधरी, दिल्लीचे सतप्रकाश राणा, बिहारचे अर्जुन साहनी आणि उत्तर प्रदेशच्या संगीता बळवंत बिंद यांची आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीचे गजेंद्र यादव, कर्नाटकचे प्रमोद माधवरराज आणि छत्तीसगडचे ललित चंद्रकर यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपने विविध राज्यांमधून सात नवीन राष्ट्रीय सचिव आणि ३७ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांचीही नियुक्ती केली.

PHOTO | Indian Cricketer Yuzvendra Chahal joins Bharatiya Janta Party. He has been appointed a member of BJP OBC Morcha’s renewed team. (Source: Third Party) pic.twitter.com/iEyKJDMXqm — Press Trust of India (@PTI_News) November 21, 2026

युझवेंद्र चहलची क्रिकेट कारकिर्द

युझवेंद्र चहल एक अनुभवी भारतीय लेग-स्पिन गोलंदाज आहे. त्याचा जन्म २३ जुलै १९९० रोजी हरियाणातील जिंद येथे झाला. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी चहलने बुद्धिबळातही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने ११ जून २०१६ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले आणि त्याच दौऱ्यावर टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले. चहलने भारतासाठी ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२१ विकेट्स आणि ८० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९६ विकेट्स घेतले आहेत.

तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सहा विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाजही ठरला. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सकडून केली. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना त्याने आपली ओळख निर्माण केली. नंतर तो राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामील झाला. त्याने १८८ आयपीएल सामन्यांमध्ये २३३ विकेट्स घेतले आहेत. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने २०२२ मध्ये पर्पल कॅप देखील जिंकली होती . त्याने ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

IND vs NZ: अवघ्या २ धावांनी शतक हुकलं अन् Shubman Gill च्या नावावर नकोसा विक्रम; धोनी-विराटच्या यादीत एन्ट्री

💡

Frequently Asked Questions

  • Que: युझवेंद्र चहलने कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे?

    Ans: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलने भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे.

  • Que: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर युझवेंद्र चहलला कोणती जबाबदारी मिळाली?

    Ans: चहलची भाजपच्या राष्ट्रीय OBC मोर्चाच्या कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

  • Que: युझवेंद्र चहलची नियुक्ती कोणी जाहीर केली?

    Ans: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राष्ट्रीय OBC मोर्चातील नवीन नियुक्त्यांच्या घोषणेदरम्यान चहलच्या नावाची घोषणा केली.

Web Title: Yuzvendra chahal joins bjp gets role in national obc morcha pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • bhartiya janta party
  • BJP
  • cricket news
  • obc
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

IND vs NZ : पंत-राहुलच्या शतकांचा धमाका ! न्यूझीलंडची अवस्था बिकट, भारताची मोठी आघाडी कायम
1

IND vs NZ : पंत-राहुलच्या शतकांचा धमाका ! न्यूझीलंडची अवस्था बिकट, भारताची मोठी आघाडी कायम

ऋषभ पंतचा शतकी धमाका ! न्यूझीलंडविरुद्ध भारताची पहिल्या डावात मोठी मजल
2

ऋषभ पंतचा शतकी धमाका ! न्यूझीलंडविरुद्ध भारताची पहिल्या डावात मोठी मजल

BJP OBC Morcha : भाजपच्या OBC मोर्चात मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील कोणाकोणाला मिळाली संधी? पाहा यादी
3

BJP OBC Morcha : भाजपच्या OBC मोर्चात मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील कोणाकोणाला मिळाली संधी? पाहा यादी

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय
4

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.