Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: कास-ठोसेघरच्या डोंगररांगांत ‘रानमेव्या’चा दरवळ! रानमेव्याची चव चाखण्यासाठी पर्यटकांची गर्दी

स्थानिक शेतकरी आणि नागरिक हा रानमेवा गोळा करून मेढा, सातारा शहर तसेच इतर बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा एक चांगला स्रोतही मिळत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 29, 2026 | 05:30 PM
Kaas Pathar Wild Fruits 2026, Satara Ranmewa Season, Karvanda Jamun Satara Market,

Kaas Pathar Wild Fruits 2026, Satara Ranmewa Season, Karvanda Jamun Satara Market,

Follow Us
Follow Us:
  • आंबुळगी, तोरणे, करवंदे आणि जांभूळ या नैसर्गिक फळांनी सातारा-जावलीचा परिसर बहरला आहे.
  • मेढा आणि सातारा शहरांतील बाजारपेठांमध्ये रानमेवा विक्रीसाठी येत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना उत्पन्न
  • कडक उन्हाळ्यामुळे आणि उष्णतेमुळे झाडांचा मोहोर गळाल्याने उत्पादनावर परिणाम
 

 Satara News : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सध्या रानमेव्याचा गोड सुगंध दरवळत असून कास पठार, ठोसेघर आणि घाटाई मंदिर परिसर रानमेव्याने बहरला आहे. कास–बामणोली परिसरासह पश्चिम घाटातील डोंगररांगांमध्ये विविध प्रकारचा रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.

आंबुळगी, तोरणे, करवंदे आणि जांभूळ यांसारख्या फळांनी जंगल परिसर समृद्ध झाला असून पर्यटक आणि स्थानिक नागरिक या रानमेव्याचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. उन्हाळ्यात सातारा–जावलीतील जंगलात फिरताना या रानमेव्याचा सुगंध पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

सातारा जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा शुभारंभ 1 मेपासून; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

स्थानिक शेतकरी आणि नागरिक हा रानमेवा गोळा करून मेढा, सातारा शहर तसेच इतर बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा एक चांगला स्रोतही मिळत आहे.

मात्र, यंदाच्या वाढत्या तापमानाचा परिणाम काही प्रमाणात जाणवत आहे. उष्णतेमुळे काही ठिकाणी झाडांचा मोहोर गळून पडल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही उपलब्ध रानमेवा चव, पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्मांमुळे नागरिकांच्या पसंतीस उतरतो आहे.

रानमेवा हा केवळ चवीपुरता मर्यादित नसून त्यात अनेक औषधी गुणधर्मही आढळतात. त्यामुळे ग्रामीण भागात त्याला विशेष महत्त्व आहे. सातारा–जावलीचा हा नैसर्गिक ठेवा पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याने त्याचे संवर्धन आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Satara News: अध्यक्षांची कागदपत्रे तक्रारदाराच्या हाती! डॉ. प्रिया शिंदेंच्या वकिलांचा विरोध अमान्य; १९ मे रोजी होणार पुढचा फैसला

वनव्यांचा फटका

यंदा लागलेल्या वनव्यांमुळे रानमेव्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक झाडे जळून नष्ट झाली असून ज्या ठिकाणी वनवा लागला नाही, तेथेच रानमेवा उपलब्ध आहे. त्यामुळे हा हंगाम मर्यादित काळासाठीच उपलब्ध राहणार आहे.

पशुपक्ष्यांची झुंबड

रानमेव्यामुळे जंगलातील पशुपक्ष्यांना अन्नाचा मोठा आधार मिळाला आहे. सकाळच्या वेळेस झाडांवर पक्ष्यांची मोठी गर्दी दिसून येत असून काही दिवस तरी त्यांच्या अन्नाची चिंता मिटली आहे.

 

Web Title: Sataras ranmewa season begins tourists flock to kaas thoseghar for wild fruits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Maharashtra News Update
  • Satara News

संबंधित बातम्या

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे
1

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा
2

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
3

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
4

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.