Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: आगे आगे देखो, होता है क्या…; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा इशारा

Satara District Bank Election 2026 News: अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना राष्ट्रवादी-शिंदेसेनेने केलेल्या एकजुटीमुळे भाजपला सत्तेच्या सर्वोच्च पदांपासून दूर राहावे लागले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या आधीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय घटनाक्रम अधिक महत्त्वाचा ठरतो.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 18, 2026 | 04:30 PM
Satara District Bank Power Equation, Udaysinh Patil Undalkar Chairman Satara

Satara District Bank Power Equation, Udaysinh Patil Undalkar Chairman Satara

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण बिनविरोध
  • निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांनी सर्व २१ संचालकांच्या उपस्थितीत घोषणा.
  • मकरंद पाटील, शंभूराज देसाई आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या समन्वयाने भाजपचा पराभव
Satara District Bank Election 2026 News: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणाने जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे वाढते वर्चस्व असताना सहकार क्षेत्रातील सत्तेचा महत्त्वाचा गड मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रितपणे राखला. अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर आणि उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याने बँकेच्या सत्तेचे केंद्र या दोन पक्षांकडे गेले आहे. या निवडीने केवळ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नाही, तर जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांचेही संकेत दिले आहेत.

बुधवारी बँकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांनी निवडीची घोषणा केली. सर्व २१ संचालक उपस्थित होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. या प्रक्रियेत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या राजकीय समन्वयाची चर्चा रंगली.

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव

 

विशेष म्हणजे, अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना राष्ट्रवादी-शिंदेसेनेने केलेल्या एकजुटीमुळे भाजपला सत्तेच्या सर्वोच्च पदांपासून दूर राहावे लागले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या आधीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय घटनाक्रम अधिक महत्त्वाचा ठरतो. अध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा की पाच वर्षांचा, याबाबतही अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे सध्याची निवड म्हणजे सत्तेचा अंतिम निर्णय की भविष्यातील राजकीय संघर्षाची सुरुवात, याची उत्सुकता आहे.

सहकाराचा वारसा अधिक सक्षम करणार! – उदयसिंह पाटील उंडाळकर, अध्यक्ष

विलासकाकांनी उभ्या केलेल्या सहकाराच्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बँकेचा कारभार पारदर्शक आणि सक्षम करण्यावर भर राहील. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी शुभेच्छा दिल्या असून सर्वांना सोबत घेऊन काम करू.

शेतकरी आणि सभासदांचे हित सर्वोच्च!- दीपक चव्हाण, उपाध्यक्ष

जिल्हा बँकेची आर्थिक सुदृढता टिकविणे, शेतकरी सभासदांचे हित जपणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणे हे प्राधान्य असेल. सर्व घटकांना विश्वासात घेऊन बँकेच्या प्रगतीसाठी काम करणार आहे.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?

जयकुमार गोरे यांचा सूचक इशारा!

जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, अशी अपेक्षा भाजपचा सदस्य म्हणून व्यक्त करण्यात गैर काही नाही. पक्षाच्या सदस्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत मी सहभागी नव्हतो. त्याची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळाबाबतही मला माहिती नाही. जिल्हा बँकेची निवडणूक झाली म्हणजे सगळे संपले असे नाही. आगे आगे देखो, होता है क्या!असा सूचक इशारा त्यांनी दिला .

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे?

    Ans: बुधवारी झालेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांनी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली

  • Que: या सत्तास्थापनेत कोणत्या नेत्यांचा समन्वय महत्त्वाचा ठरला?

    Ans: सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यात मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचा राजकीय समन्वय निर्णायक ठरला.

  • Que: या निवडीमुळे भाजपसमोर कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे?

    Ans: अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना राष्ट्रवादी-शिवसेनेने एकजूट दाखवल्याने भाजपला बँकेच्या सत्तेच्या सर्वोच्च पदांपासून दूर राहावे लागले आहे.

Web Title: Satara district bank power equation ncp shiv sena keeps bjp out udaysinh undalkar chairman as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara News

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?
1

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 
2

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू
3

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.