Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

Pratap Sarnaik: स्क्रॅप करण्यायोग्य तसेच नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या नियमबाह्य रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2026 | 04:31 PM
प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये
  • ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा
  • प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा
 

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होताना त्या कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत. स्क्रॅप रिक्षांविरोधात ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले.

स्क्रॅप झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी आज विशेष बैठक घेतली. परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव तसेच राज्यभरातील विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र

वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई

“प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. नियमबाह्य आणि धोकादायक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास कोणतीही मुभा दिली जाणार नाही,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. स्क्रॅप घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा वापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंदणी किंवा नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यात यावी. संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासोबतच आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रवासी वाहतुकीची परवानगी

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवावी आणि ५ ऑक्टोबरपर्यंत स्क्रॅप रिक्षांविरोधातील कारवाईचा आढावा सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. रिक्षा-टॅक्सी चालक आणि संघटनांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नियमांचे पालन करावे. नियमबाह्य वाहनांमुळे संपूर्ण रिक्षा व्यवसायाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी अधिकृत आणि सुरक्षित वाहनांनाच प्रवासी वाहतुकीची परवानगी असावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

स्क्रॅप रिक्षा म्हणजे नियमानुसार वापरासाठी अयोग्य ठरलेली किंवा निर्धारित कालावधी/फिटनेस निकष पूर्ण न करणारी आणि भंगारात (scrap) काढणे आवश्यक असलेली रिक्षा.

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान

Web Title: Scrap auto rickshaws special drive till october 5 pratap sarnaik orders strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • auto rickshaw
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला
1

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?
2

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
3

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?
4

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.