
Mansar DC Division,
या विषयावर यादव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले होते. या निवेदनामुळे आता कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्य महाव्यवस्थापक यांच्याकडे आदेशासह पाठवले होते. आता मुख्य महाव्यवस्थापक (मार्स) यांनी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना दिली आहे.
Winter Session: सुरक्षेचे नियम धाब्यावर, मंत्री-आमदारांनाच शिस्तीची गरज; पोलिसांच्या गोपनीय अहवाल
या सूचनेची प्रत नागपूर आणि मुंबई येथील महावितरणचे संचालक (मा.सं) आणि कार्यकारी संचालक यांना देखील पाठविण्यात आली आहे. यादव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, मौदा विभागांतर्गत रामटेक उपविभाग कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या मनसर डीसीचे भौगोलिक क्षेत्र आणि ग्राहक संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे महसूल वसुली, बिद्युत पुरवठा दुरुस्ती आणि देखभाल यासाठी मनसर डीसीचे विभाजन करणे आवश्यक आहे.
मनसर परिसरामध्ये घनदाट जंगल, रामधाम, चोरबाहुली, फरिस्ट सफारी, पेंच टायगर रिझर्व्ह यांसारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. डीसीचे विभाजन झाल्यास येथील वीज वितरणाचे कार्य सुलभ होईल, यादव यांनी पुढे सांगितले की, शितलवाडी-परसोडा ग्रामपंचायत क्षेत्रात मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी नवीन डी.सी. (विद्युत वितरण केंद्र) बसवणे गरजेचे आहे. या संदर्भात, कार्यकारी अभियंता, मौदा विभाग यांनी विविध मुद्दद्यांसह एक प्रस्ताव तयार करून मुख्य अभियंता महावितरण, नागपूर यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवला आहे.
मनसर डीसी (सुधारित) B> मुख्यालय मनसर, समाविष्ट गावे २६. ग्राहक संख्या ४९००, वार्षिक महसूल २५ कोटी रुपये, ट्रान्सफॉर्मर ३०५, एलटी लाईन ५०९ किमी, एचटी लाईन २३५ किमी, उपकेंद्र ३३/११ मनसर
रामटेक ग्रामीण डीसी (सुधारित) B> मुख्यालय रामटेक, समाविष्ट गावे ३८, ग्राहक संख्या ४५००, वार्षिक महसूल १० कोटी रुपये, ट्रान्सफॉर्मर २९६, एलटी लाईन ५४० किमी, एचटी लाईन ४३४ किमी,
नगरधन डीसी (सुधारित) B> मुख्यालय नगरधन, गावे-२२, ग्राहक संख्या -४६००, वार्षिक महसूल १५ कोटी रुपये, ट्रान्सफॉर्मर ३८९, एलटी
लाईन ३०१ किमी, एचटी लाईन २४६ किमी, उपकेंद्र ३३/११ नगरधन,
शितलवाडी डीसी (नवीन प्रस्तावित)
मुख्यालय – शितलवाडी (परसोडा), समाविष्ट गावे २१, ग्राहक संख्या ७६०३, वार्षिक महसूल ६ कोटी रुपये, ट्रान्सफॉर्मर ११५, एलटी लाईन ४७५ किमी, एचटी लाईन १३५ किमी.
विभाजनानंतरचा आर्थिक भार- अनुमानित ५४ लाख ०९ हजार १८४ रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे रामटेक तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतील.
विद्युत पुरवठा करणारे 33/11 केवी उपकेंद्र मनसर, नगरधन, पवनी, वडांबा, घोटीटोक, अरोली, खात
मनसर डीसीच्या विभाजनाचा प्रस्ताव मनसर डीसीची भौगोलिक व्याप्ती खूप मोठी आहेः उत्तर दिशेला 32 किमी, दक्षिण दिशेला 21 किमी (महाराजपूर प्रस्तावित नवीन शितलवाडी डीसी), पूर्व दिशेला 31 किमी (सत्रापूर प्रस्तावित मनसर डीसी), आणि पश्चिम दिशेला 15 किमी (खंडाला डुमरी प्रस्तावित मनसर डीसी). या कारणामुळे डीसीचे विभाजन करणे गरजेचे आहे. मनसर हे प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने, येथे दररोज अंदाजे 10,000 पर्यटक येतात किंवा या मागनि प्रवास करतात. मनसर डीसीचे मनसर आणि शितलवाडीमध्ये विभाजन केल्यास परिसरातील वीज ग्राहकांना मोठी सोय होईल.
1) मूलभूत माहिती
मुख्यालय: रामटेक
एकूण गावे: 216
एकूण ग्राहक संख्या: 48,286
2) महसूल व ग्राहक तपशील
प्रस्तावित वार्षिक महसूल: ₹99.16 कोटी
एचटी (HT) ग्राहक: 41
3) वीज वितरण संरचना
ट्रान्सफॉर्मर संख्या: 2,026
एलटी (LT) लाईन: 3,627 किमी
एचटी (HT) लाईन: 1,674 किमी