Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!

Best Before Reality : अनेकदा पॅकबंद अन्नपदार्थांवर असणारी 'Best Before' तारीख निघून गेल्यावर लोक ते अन्न खराब किंवा विषारी समजून फेकून देतात. मात्र, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण FSSAI ने याबाबत मोठा गैरसमज दूर केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 10, 2026 | 04:12 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • … मग अन्न विषारी होतं?
  • Best Before चा नियम काय सांगतो?
  • FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!
Best Before Reality : आपण बाजारातून वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करतो. त्या वस्तूंमागे, बरीच माहिती प्रिंट असते. कुठून बनलंय, कोणत्या गोष्टींपासून बनलंय असा बराच आशय लिहीलेला असतो. यासोबतच दोन तारखा लिहीलेल्या असतात. पॅकिंगची तारीख आणि दुसरी म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही त्या वस्तूचा वापर करु शकता अशी Best Before तारीख ( Best Before Reality ) . ही तारीख सर्वेच अनुषंगाने फार महत्त्वाची असते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणा FSSAI ने अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी ग्राहकांना खाद्यपदार्थांच्या लेबलवरील उत्पादन आणि मुदत समाप्तीच्या तारखांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. याबाबत असलेल्या प्रश्नांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Singapore Airlines India GM : सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा! भारत प्रमुखपदी अश्विन के. यांची नियुक्ती

‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये FSSAI ने म्हटले आहे, “खाद्यपदार्थाच्या पॅकेजवरील तारीख हा केवळ एक आकडा नाही; तर काय सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे हे निवडण्यास ती तुम्हाला मदत करते. वेगवेगळ्या तारखांच्या लेबलचा अर्थ समजून घेतल्यास अन्नाची नासाडी कमी होण्यास आणि तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यास मदत होऊ शकते. काहीही खाण्यापूर्वी नेहमी लेबल वाचा.” अशा शब्दांत पोस्ट शेअर करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

योग्य तारखेचा नेमका अर्थ काय? समजून घ्या

#HarLabelKuchKehtaHai या मोहिमेचा एक भाग म्हणून, FSSAI ने स्पष्ट केलं आहे की ‘वापरण्याची अंतिम तारीख’ म्हणजे Use By किंवा ‘समाप्तीची तारीख’ म्हणजेच Expiry Date नेहमी तपासणे महत्त्वाचे आहे, कारण ही एक सुरक्षिततेची बाब आहे. “या तारखेनंतर अन्नपदार्थ खाऊ नका.” FSSAI च्या मते, बहुतेक लोकांना पॅकेजवरील तारखांचा योग्य अर्थ समजत नाही, ज्यामुळे अनेकदा अन्न खराब न होताही कचराकुंडीत फेकले जाते. तर या तारखांचा नेमका अर्थ काय आहे. समजून घ्या.

A date on a food package is more than just a number, it helps you make safer and smarter food choices. Understanding what different date labels mean can reduce food waste while protecting your health. Always read the label before you eat. #HarLabelKuchKehtaHai #ReadTheLabel pic.twitter.com/oSIhFS1JRx — FSSAI (@fssaiindia) August 9, 2026

Best before – ही तारीख उत्पादनाची गुणवत्ता दर्शवते. याचा अर्थ असा की, या तारखेपर्यंत अन्नपदार्थाची चव, सुगंध आणि पोत टिकून राहील. या तारखेनंतर, अन्नपदार्थ खराब होणार नाही; उलट, त्याची गुणवत्ता थोडी कमी होईल. तरीही, तो वापरला जाऊ शकतो.

Expiry Date – ही तारीख अन्न सुरक्षेसाठी अंतिम मर्यादा आहे. या तारखेनंतर अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. एक्स्पायरी डेटनंतर उत्पादन टाकून देणे शहाणपणाचं ठरेल.

अशा प्रकारे अन्नाची नासाडी टाळा

FSSAI सल्ला देते की, जर एखाद्या उत्पादनाची ‘उत्तम वापराची’ तारीख नुकतीच उलटून गेली असेल, तर ते फेकून देण्याऐवजी, प्रथम त्याचा रंग, पोत आणि वास तपासा. सर्व काही ठीक असल्यास, ते वापरले जाऊ शकते. अन्न खरेदी केल्यानंतर, मार्गदर्शक तत्त्वांनुसार ते साठवणे देखील महत्त्वाचे आहे, कारण अयोग्य साठवणुकीमुळे अनेकदा ते वेळेपूर्वीच खराब होऊ शकते. त्यामुळे लक्ष्य द्या आणि त्यानुसारच गोष्टींचा वापर करा किंवा टाळा.

Ethanol Government Subsidy : मोठा निर्णय! आता इथेनॉलवर केंद्राकडून मिळणार सबसिडी! कोणाला, कसा फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Best before reality does food become poisonous fssai clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Antivirus
  • Bad Quality Food
  • Business News
  • food
  • food news
  • Food Poison
  • Food Safety
  • FSSAI
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
3

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.