Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती; इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी संध्याकाळी एक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत दोन नावं होती चर्चेत, ज्यात असिम गुप्ता आणि अश्विनी भिडेंची चर्चा होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2026 | 07:23 AM
इतिहासात पहिल्यादा महिला आयुक्तपदी

इतिहासात पहिल्यादा महिला आयुक्तपदी

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळाल्या आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केल्याची माहिती आहे. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपत असल्यामुळे त्यांच्या जागी नवीन आयुक्त कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या पदासाठी अश्विनी भिडे यांची नियुक्ती निश्चित झाल्याची माहिती दिली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी संध्याकाळी एक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत दोन नावं होती चर्चेत, ज्यात असिम गुप्ता आणि अश्विनी भिडेंची चर्चा होती. मात्र, शेवटी अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून, विविध विकासकामे, पायाभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर राज्य सरकारचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे नव्या आयुक्तांकडून वेगवान आणि प्रभावी निर्णयक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाल्यामुळे महापालिकेच्या कामकाजात गती येईल, असेही म्हटले जात आहे.

महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. आपल्या प्रशासकीय अनुभवासाठी आणि कठोर कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भिडे या सरकारमधील सर्वात विश्वासू आणि खंबीर अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात जवळच्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक राहिल्या आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयातही सचिव म्हणून काम

यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) सचिव म्हणून काम पाहिले, जिथे त्यांनी महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुंबईच्या महत्त्वाकांक्षी भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून, अश्विनी भिडे यांनी प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील याची खात्री करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मेट्रोच्या प्रशासकीय संचालकाचीही होती जबाबदारी

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMRCL) प्रशासकीय संचालकपदही अश्विनी भिडे यांनी सांभाळले. त्यानंतर अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार स्वीकारून मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव, मंत्रालय (Mantralaya) मुंबई येथेही कार्यरत होत्या.

हेदेखील वाचा : ‘अर्थ अवर’ पाळण्यास मुंबईकर निरुत्साही! पर्यावरण विषयावर प्रचंड खल, चर्चेचे ठोस कृतीत रूपांतर होईना

Web Title: Senior ias officer ashwini bhide appointed as commissioner of the mumbai municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 07:10 AM

Topics:  

  • Ashwini Bhide
  • BMC
  • Brihanmumbai Municipal Corporation
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
2

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
3

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
4

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.