Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहर वाहतूक विभागात खांदेपालट; 31 बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या

वाहतूक विभागात खांदेपालट केले असून, शहरातील सर्व ३१ वाहतूक विभागाच्या प्रमुखांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2025 | 12:00 PM
पुणे शहर वाहतूक विभागात खांदेपालट; 31 बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे शहर वाहतूक विभागात खांदेपालट; 31 बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मुक्तता करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, विविध उपाययोजनांसोबतच आता अंतर्गत देखील बदल सुरू केले आहेत. त्यानूसार, पहिले पाऊल टाकत वाहतूक विभागात खांदेपालट केले असून, शहरातील सर्व ३१ वाहतूक विभागाच्या प्रमुखांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या ठिकाणी त्यांना नेमणूक दिली असून, सुरळीत वाहतूकीच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहनांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कोथरूड, शिवाजीनगर, स्वारगेट, हडपसर, बाणेर, नगर रोड, कात्रज आदी प्रमुख मार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर सक्रिय असतात.

तथापि, काही वेळा अपघात किंवा वाहतूक कोंडीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनास्थळी त्वरीत पोहचणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस निरीक्षकांची नेमणूक त्यांच्या राहत्या ठिकाणाच्या जवळच्या विभागात करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे पोलीस निरीक्षकांना अपघात अथवा इतर तातडीच्या घटनांमध्ये लवकर प्रतिसाद देता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मदत होईल तसेच नागरिकांची गैरसोय टळेल, असा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यानूसार वाहतूक शाखेतील तब्बल ३१ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या आधिकार्‍यांना तात्काळ नव्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या सूचना

पुणे शहरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न आहे. त्यात पावसाळ्यामध्ये यात भर पडते. प्रमुख रस्त्यांवर पाणी साचणे, कोंडी यासांरख्या समस्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या कालावधीत सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्तांनी केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने वाहतूक पोलिस, प्रभारी अधिकार्‍़यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Senior police officers in pune city traffic department have been transferred

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police Action
  • Traffic

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
2

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
4

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.