Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; 20 ऑक्टोबरपर्यंत...
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांचे समुपदेशन करून जमीन देण्यास संमती घेण्यास २५ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीत सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे.
मुदत संपुष्टात येत असल्याने शेतकऱ्यांसह सरंपचांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. मुदतवाढ दिल्याने आणखी शेतकरी आल्यानंतर काही शेतकरी संमती देण्यास पुढे येत आहेत. गेल्या महिनाभरापासून भूसंपादन उपविभागीय समन्वयक, अधिकाऱ्यांनी सासवड येथे तळ ठोकूनच संमती घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे संमती मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळू लागली आहे.
Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रकिया अत्यंत वेगात सुरु; मोबदला लवकरच जाहीर होणार
– जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
पुरंदरचा विमानतळ प्रकल्प रद्द करावा; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये केंद्र सरकारने विमानतळ प्रकल्प जाहीर केला असून, महारष्ट्र शासनाकडून जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र यामध्ये आम्हाला शासनाने कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही. तसेच आमच्या सातही गावची सर्व जमीन सुपीक आणि बागायती आहे. शेतकरी वर्षातून तीन पिके घेतात, मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. विमानतळ प्रकल्पामुळे आम्हाला कायमचे विस्थापित व्हावे लागणार आहे. त्यामुळे येथील प्रकल्प तातडीने हद्दप्पार करावा, अशी मागणी विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.