Sahmbhuraj Desai Vs Anil Parab: विधानपरिषद आहे की कुस्तीचा आखाडा? परबांना देसाई भिडले; म्हणाले, "बाहेर ये तुला..."
मुंबई: राज्यात सध्या अनेक प्रकरणे घडताना दिसत आहेत. मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरु आहे. काल आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनमध्ये केलेली मारहाण अशा अनेक घटना घडत आहेत. दरम्यान सध्या राज्याचे अधिवेशन सुरु असून, या अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार अनिल परब यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून बोलताना आमदार परब यांनी तू गद्दारी केली असे शंभूराज देसाई यांना म्हटले. यावर शंभूराज देसाईसुद्धा चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. विधानपरिषदेत सुरु झालेली खडाजंगी विधानभवनाच्या बाहेर पाहायला मिळाली.
नेमके घडले काय?
विधान परिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली. यावेळेस त्यांनी संभूराज देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख केला. त्यानंतर देसाई यांचा पारा देखील चांगलाच चढला. यानंतर शंभूराज देसाई यांनी अरे तू गद्दार कोणाला म्हणतो? बाहेर ये तुला दाखवतो. असे म्हणत चांगलेच प्रत्युत्तर दिले.
विधानपरिषेदत मराठी माणसाच्या मुद्द्यावर अनिल परब बोलत होते. मराठी माणसाच्या घरांवरून चर्चा सुरु होती. अनिल परब यांच्यानंतर मंत्री शंभूराज देसाई उत्तर देत असताना ही खडाजंगी पाहायला मिळाली. सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदार आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे.