Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगारासाठी ‘टोकाची लढाई’! शनी शिंगणापुरात कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ

शनिशिंगणापूर येथे कार्यरत नवीन कायम कर्मचाऱ्यांनी तब्बल सात महिन्यांचे थकित वेतन मिळावे यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 30, 2026 | 09:18 PM
शनी शिंगणापुरात कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ

शनी शिंगणापुरात कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शनैश्वर देवस्थान शनिशिंगणापूर येथे कार्यरत नवीन कायम कर्मचाऱ्यांनी तब्बल सात महिन्यांचे थकित वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवार (दि. ३० मार्च) पासून देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे देवस्थान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी अत्यंत व्यथित स्वरात सांगितले की, “आम्ही गेल्या सात महिन्यांपासून नियमितपणे सेवा बजावत आहोत, मात्र आमच्या कष्टाचे मोबदले अद्याप मिळालेले नाहीत. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.”

कर्मचाऱ्यांच्या मते, या आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांनी कर्ज काढून, उसनवारी करून संसाराचा गाडा ओढला; मात्र आता कुणीही पैसे देण्यास तयार नसल्याने परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. “घर चालवणे कठीण झाले आहे. आमच्या मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर परिणाम होत आहे,” अशी वेदना त्यांनी व्यक्त केली.

Satara News: सत्ता परिवर्तनाची चळवळ तळागाळात राबवली पाहिजे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा साताऱ्यात पवित्रा

या आंदोलनाला केवळ वेतनाचा प्रश्न म्हणून न पाहता, हा प्रशासनातील संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारा गंभीर मुद्दा असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सातत्याने पत्रव्यवहार करूनही जर संबंधित यंत्रणा दखल घेत नसेल, तर कर्मचाऱ्यांचा संताप टोकाला जाणे स्वाभाविक असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

दरम्यान, आंदोलकांनी इशारा दिला आहे की, येत्या काही दिवसांत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर ते अधिक तीव्र आंदोलन छेडतील. काही कर्मचाऱ्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेत सामुदायिक आत्मदहनाचा इशाराही दिला आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, “या प्रकरणात उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी संबंधित प्रशासकीय समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच राज्य शासनावर राहील.”

Shikhar Shingnapur Yatra: ‘हर हर महादेव’च्या गर्जनेने मुंगीघाट दुमदुमला! लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता

प्रश्न केवळ वेतनाचा नाही, तर व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा

शनी शिंगणापूरसारख्या आस्था आणि श्रद्धेच्या केंद्रस्थानी जर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे वेतन वेळेवर मिळत नसेल, तर ही केवळ आर्थिक विसंगती नसून व्यवस्थेच्या अपयशाची स्पष्ट चिन्ह आहे. धार्मिक संस्थांकडून पारदर्शकता, जबाबदारी आणि मानवतेचा दृष्टिकोन अपेक्षित असतो.

कर्मचाऱ्यांना वेतन न देणे म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणे होय. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे केवळ औपचारिकतेने न पाहता तातडीने तो सोडवण्याची गरज आहे. अन्यथा, वाढत्या असंतोषामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज गरज आहे ती संवाद, सहानुभूती आणि तातडीच्या निर्णयक्षमतेची. कर्मचाऱ्यांचे वेतन देणे हा उपकार नसून त्यांचा अधिकार आहे—आणि तो वेळेत मिळणे हीच प्रशासनाची खरी कसोटी आहे.

— सामाजिक कार्यकर्ते,
संदीप कुसळकर

प्रशासनाची भूमिका

सदर उपोषणास बसलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. मुंबई धर्मादाय आयुक्तांनी संबंधित नोकर भरती प्रकरणी तत्कालीन विश्वस्त मंडळाला कलम 41(D) अंतर्गत नोटीस बजावली होती.सध्या हे नोकर भरतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, या संदर्भात देवस्थान प्रशासन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. अशी ठाम भूमिका शनी शिंगणापूर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी मांडली आहे.

Web Title: Shani shingnapur employee protest unpaid salary hunger strike self immolation warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Shani Shingnapur

संबंधित बातम्या

श्रावणातील शेवटच्या शनिवारी शनिशिंगणापूर गजबजले; दर्शनासाठी लांबच लांब रांगा
1

श्रावणातील शेवटच्या शनिवारी शनिशिंगणापूर गजबजले; दर्शनासाठी लांबच लांब रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.