Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशांत जगतापांच्या पक्षबदलाची राज्यभर चर्चा, शरद पवारांचं नुकसान; काँग्रेससाठी फायदा?

पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 27, 2025 | 12:18 PM
प्रशांत जगतापांच्या पक्षबदलाची राज्यभर चर्चा, शरद पवारांचं नुकसान; काँग्रेससाठी फायदा?

प्रशांत जगतापांच्या पक्षबदलाची राज्यभर चर्चा, शरद पवारांचं नुकसान; काँग्रेससाठी फायदा?

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रशांत जगतापांच्या पक्षबदलाची राज्यभर चर्चा
  • शरद पवारांचं नुकसान
  • काँग्रेससाठी फायदा होणार?
पुणे/दीपक मुनोत : पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतण्या आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे चुलत बंधू राजकीय पातळीवर एकत्र आले. संपूर्ण मराठी मीडिया या दोन घटनांनी व्यापून टाकला होता. वृत्तपत्रांमध्ये रकाने भरभरून या घडामोडींची प्रसिद्धी केली जात होती. पण, अशा वातावरणात प्रशांत जगताप यांचा राजीनामा महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या चर्चेत राहिला आहे.

नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले होते. त्या छोट्या-छोट्या गावातल्या स्थानिक राजकारणाचा विचार करून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड या मोठ्या शहरांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची युती होत आहे या बातमीने अनेकांना धक्का बसला. शरद पवार भाजपविरोधी राजकारण केंद्रस्थानी असल्याचे मानतात. तशी विधानेही करतात आणि त्याचवेळी भाजपबरोबर सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्याशी युतीची बोलणी करतात. हा मुद्दा अनेकांना धक्का देणारा होता.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष अजित पवार यांच्याशी युती करत नाही, आमच्यात मैत्रीपूर्ण लढती होतील, असे जाहीर करतो. त्यानंतर दोन्ही पवार एकत्र येतात. या घटनाक्रमामुळे कार्यकर्ते गोंधळून गेले. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप वैचारिक विरोध दर्शवत पक्षाचा राजीनामा देतात, ही घटना राजकीय पटलावर मोठी ठरते. त्यामुळे ती चर्चेचा विषय होते. या राजीनाम्यामुळे पक्षाची प्रतिमा डॅमेज होते आणि ती कंट्रोल करण्यासाठी पक्षाच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांना प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलावे लागते. त्यामुळे घटना मोठी ठरते. जगताप यांनी उपस्थित केलेले प्रश्न भाजपलाही विचार करायला लावणारे आहेत.

प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यावर काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. १०, १२ वर्षांच्या कालावधीनंतर एका मोठ्या नेत्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेससाठी हा बोनस आहे. पुण्याच्या प्रश्नांची सखोल जाण असणारे, संयमी आणि स्पष्ट भूमिका मांडणारे प्रशांत जगताप काँग्रेससाठी महत्वाचे आहेत. महापौर म्हणून त्यांची कारकीर्द चांगली होती. पाणी प्रश्नावर त्यांनी भाजपशी संघर्ष केला होता. प्रशांत जगताप सध्या ४७ वर्षाचे आहेत. अजून बराच काळ त्यांना राजकारणात काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना पाठबळ दिल्यास पुण्यात काँग्रेससाठी चांगले नेतृत्व तयार होईल.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यात चुरशीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतरही, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीची पक्षसंघटना बळकट करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यामुळेच एक होतकरू, तरूण, कुशल संघटकही पवारांनी गमावला आहे.

Web Title: Sharad pawar has suffered a loss due to prashant jagtap joining congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • ajit pawar
  • MP Sharad pawar
  • pune news

संबंधित बातम्या

ठाकरेंच्या शिवसेनेची गळती सुरुच; पुण्यातील बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
1

ठाकरेंच्या शिवसेनेची गळती सुरुच; पुण्यातील बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

आता याला काय म्हणावं? लग्नाच्या अवघ्या 24 तासांत घटस्फोट; कारण काय तर…
2

आता याला काय म्हणावं? लग्नाच्या अवघ्या 24 तासांत घटस्फोट; कारण काय तर…

Political News : पुण्यात काका-पुतण्या एकत्र नाहीच; दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य आघाडी चर्चेनंतर फिस्कटली
3

Political News : पुण्यात काका-पुतण्या एकत्र नाहीच; दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य आघाडी चर्चेनंतर फिस्कटली

राजकीय हालचालींना वेग, भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरू
4

राजकीय हालचालींना वेग, भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.