Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar: ‘मी ही सातारचा तुम्ही सातारचे’, एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना शरद पवारांची गुगली

सातारा जिल्ह्यातील एक नाव आहे ते म्हणजे नांदवे. हे गाव शरद पवारांचं गाव आहे. त्यामुळे मी पण सातारा जिल्ह्याचा आहे असं शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. मी ही सातारचा तुम्ही सातारचे हे पवारांनी सांगण्या मागचा अर्थ काय?

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 11, 2025 | 11:50 PM
'मी ही सातारचा तुम्ही सातारचे', एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना शरद पवारांची गुगली

'मी ही सातारचा तुम्ही सातारचे', एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना शरद पवारांची गुगली

Follow Us
Follow Us:

सातारा जिल्ह्याने बरेच मुख्यमंत्री दिले आहेत. पहिले मुख्यमंत्री हे धनजीभाई कूपर हे होते. ते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. पण यावेळी शरद पवारांनी एक आठवण आवर्जून करून दिली. ते म्हणाले यात एक नाव अजून आहे. सातारा जिल्ह्यातील एक नाव आहे ते म्हणजे नांदवे. हे गाव शरद पवारांचं गाव आहे. त्यामुळे मी पण सातारा जिल्ह्याचा आहे असं शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. मी ही सातारचा तुम्ही सातारचे हे पवारांनी सांगण्या मागचा अर्थ काय अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न केले. शिवाय त्यावेळी त्यांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला, अशी कौतूकाची थाप शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिली. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरणानंतर शरद पवार बोलत होते. दिल्लीत हा सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादीत्य शिंदे ही उपस्थित होते.

यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. एकनाथ शिंदे यांनी आपली कारकीर्द ठाणे महापालिकेपासून सुरू केली. ज्या दिग्गजांनी ठाण्यात चांगलं काम केलं ते काम एकनाथ शिंदे यांनी पुढे नेलं. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. हे करत असताना त्यांनी कधी पक्षाचा विचार केला नाही. सर्वां बरोबर त्यांनी सुसंवाद ठेवला. वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक त्यांनी त्यांच्या काळात केली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई,वसई विरार हा झपाट्याने नागरिकरण होणारा भाग आहे. या भागाच्या प्रश्नांची जाण असलेला नेता कोण असेल याची माहिती घेतली, तर तो नेता एकनाथ शिंदे आहे. असं ही शरद पवार यावेळी म्हणाले. या भागातल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असंही ते म्हणाले. शिंदेंकडून शिंदेंना शिंदेंच्या जावया मार्फत हा पुरस्कार दिला जात असल्याबद्दलही शरद पवारांनी यावेळी आनंद व्यक्त केला. हा एक योगायोग असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान साहित्य समेलन दिल्लीत होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर दिल्लीत साहित्य संमेलन झालं होतं. त्याला पंडीत जवाहरलाल नेहरू आले होते. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. अशी आठवणही सांगितली. त्यामुळे राजधानीत राहाणाऱ्या मराठी माणसासाठी हे संमेलन पर्वणी असल्याचे ते म्हणाले. या मुळे दिल्लीकर मराठी माणूस खुषीत आहेत. ते या संमेलनात पंतप्रधानांच्या भाषणाची वाट पाहात आहेत. सध्या दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाची चर्चा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Sharad pawar praised former cm eknath shinde at mahadji shinde rashtra gaurav award delhi and satara minister list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • NCP Chief Sharad Pawar

संबंधित बातम्या

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
1

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
2

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले
3

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
4

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.