Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar : शरद पवारांनी अखेरचा डाव टाकला; निवडणूक प्रचारात उतरवलंं थेट पवार घराण्यातील या व्यक्तीला

राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनीही प्रचारसभा सुरू केल्या असून शरद पवार हेदेखील त्यांच्यासोबत दिसत आहेत. बारामतीच्या कान्हेरी गावातही शरद पवारांनी नातवासाठी सभा घेतली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 13, 2024 | 06:32 PM
सद्गुरूंनी दिला उपाय, शरीरातील घाण बाहेर फेकेल हा पदार्थ

सद्गुरूंनी दिला उपाय, शरीरातील घाण बाहेर फेकेल हा पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

बारामती:   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. महाराष्ट्रात सर्वात चर्चेचा कोणता मतदारसंघ असेल तर तो बारामती विधानसभा मतदारसंघ. बारामतीत येथे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट लढत आहे. पण, ही लढत आता खूपच भावनिक झाली आहे. शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांच्या घरातच घुसखोरी केली नाही तर आता नातवाच्या हितासाठी त्यांच्या पत्नी म्हणजे प्रतिभा पवार यांनाही मैदानात उतरवले आहे. शरद पवार यांच्या पत्नी निवडणूक प्रचारात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. युगेंद्र हे अजित पवार यांचेच पुतणे आहेत. अशा स्थितीत या जागेवर अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा थेट पणाला लागली आहे. त्यातच प्रतिभा पवारांना मैदानात उतरवल्यामुळे  अजित पवारांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

अशा स्थितीत दोन्ही पक्ष जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. खुद्द शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली असून आता त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही नातवासाठी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांना खुले आव्हान दिले आहे. अजित पवार यांनी बारामतीच्या कान्हेरी गावात सभा घेऊन ताकद दाखवत उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनीही प्रचारसभा सुरू केल्या असून शरद पवार हेदेखील त्यांच्यासोबत दिसत आहेत. बारामतीच्या कान्हेरी गावातही शरद पवारांनी नातवासाठी सभा घेतली. पवार कुटुंबाने कान्हेरी गावातून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. आजोबा, काका, काकू, भाऊ, संपूर्ण पवार कुटुंब युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.

हेही वाचा: ‘या दिवशी मंदिरात होणार हिंसाचार, अयोध्येला आम्ही हादरवून टाकू’, खलिस्तानी दहशतवादी पन्नूनं दिली राम मंदिर उडवण्याची

प्रतिभा पवारही प्रचाराच्या मैदानात

बारामतीत प्रचारासाठी पवार कुटुंबीय कसोशीने प्रयत्न करत आहेत, मात्र आजी प्रतिभा पवारही नातवासाठी मैदानात उतरल्या आहेत. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी मंगळवारी पश्चिम विभागाचा दौरा करून युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. प्रतिभा पवार यांनीलोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचारही केला होता.

प्रतिभा पवार (काकू) माझा पराभव करतील का?  अजित पवारांचा सवाल

बारामती विधानसभा मतदारसंघात काका-पुतण्याची लढत अत्यंत चुरशीची होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रोहित पवारच्या ईडीच्या चौकशीदरम्यान प्रतिभा पवारही कार्यालयात गेल्या होत्या. प्रतिभा पवार यांनी कधीही कोणाचा प्रचार केला नाही. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रतिभा पवार यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनली आहे. प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीवरही अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका मुलाखतीत अजित पवार म्हणाले की, मी प्रतिभा काकींच्या सर्वात जवळ होतो. त्या माझ्या आईसारख्या आहेत. गेली 40 वर्षे घरोघरी प्रचार केला नाही. पण, आता ती घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. मग त्या माझा पराभव करतील का?

हेही वाचा: Eknath Shinde Viral Video: एकनाथ शिंदेंचा ताफा जात असतानाच मुंबईत घडलं असं काही की

Web Title: Sharad pawars last battle in the election field the queen was directly brought to the field nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 09:58 AM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra election 2024
  • Pratibha Pawar
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
1

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
2

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.