Photo credit- Social Media काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशद्रोही, गद्दार अशी घोषणाबाजी
मुंबई: विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राज्याच राजकारण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांचा प्रचारसभांचा धुराळा उडाला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत यंदा चुरशीची लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिवसेंदिवस संघर्ष शिगेला पोहतच आहे. त्यामुंबईत घडलेल्या एका प्रकारामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्षात आणखीच भर पडली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे इतके का भडकले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. व्हायरल व्हिडीओनुसार मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयाजवळून जात होते. त्याचवेळी त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या काही कार्यकर्त्यांनी देशद्रोही, गद्दार, गद्दार अशी घोषणाबाजी केली. ती घोषणाबाजी ऐकून मुख्यमंत्र्यांनाही संताप अनावर झाला.
हेही वाचा: Budhwarche Upay: बुधवारी करा सोपे उपाय, करिअरमध्ये पडेल पैशांचा पाऊस
एकनाथ शिंदेंनी आपली गाडी थांबवली आणि थेट काँग्रेसच्या कार्यालयातच घुसले. त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त करत तुम्ही लोक असेच शिकवता का, असे म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे विरोधक विशेषत: ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे गटाला ‘गद्दार’ आणि ‘देशद्रोही’ , महाराष्ट्रातील जनता गद्दारांना धडा शिकवेल, अशा शब्दांत त्यांच्यावर वारंवार टीका केली जाते. तर शिंदे गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिले जाते.
हेही वाचा: प्रेमात आहात का? 13 नोव्हेंबर, 2024 चे Love Rashifal काय सांगते
त्यातच काल सायंकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री शिंदे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी सोमवारी (11 नोव्हेंबर) मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार दिलीप लांडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे आले होते. तेथून परतत असताना काही लोकांनी काळे झेंडे दाखवत वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले.