मुंबई : काल राजधानी मुंबईत दसरा मेळाव्यावरुन वातावरण चांगलेच तापले होते. राज्यातील सत्तातरानंतर शिवसेना व शिंदे गटासाठी कालचा पहिलाच दसरा मेळावा होता. दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका तसेच राजकारण होताना सर्वांनी पाहिले. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झाला, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा आपपल्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असल्याचे वातावरण केले होते. मात्र, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून एक वेगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
[read_also content=”तिरंदाजीत गौरवचा सहा तासात पदकाचा डबल धमाका, महाराष्ट्राची सहा पदकांना गवसणी https://www.navarashtra.com/sports/national-sports-competition-in-archery-gaurav-lambe-double-blast-of-medals-maharashtra-wins-six-medals-333268.html”]
दरम्यान, शिंदे गटाचा राजकीय मेळावा बांद्रा कुर्ला संकुलावरती पार पडला. या मेळाव्याला येणाऱ्या वाहनांची व्यवस्था मुंबई विद्यापीठामध्ये पार्किंगची व्यवस्था करून “दसऱ्याच्या सणाला” सोन लुठण्याची परंपरा आहे. पण मुंबई विद्यापीठाच्या संकुलाचा मद्यपीना दारू पिण्याची व्यवस्था केली गेली. दारूच्या बाटल्यांचा संकुलामध्ये खच पडलेला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनं टिका केली आहे. विद्यापीठ परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच व जागोजागी ढिग पडल्याचे आज चित्र होते. त्यामुळं विद्यार्थ्यांनी व येथे येणा-या लोकांनी संताप व्यक्त केला असून, शिंदे गटाचा दसरा मेळावा म्हणायचा की, ‘कचरा’ मेळावा म्हणायची अशी वेळ लोकांवर आली आहे. दरम्यान, शिवतीर्थावर पार पडलेल्या शिवसेनेच्या अस्सल मेळाव्यात बोलताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी, ‘शिवाजी पार्कातला मेळावा हा दसरा मेळावा आहे तर बीकेसीतील मेळावा हा कचरा मेळावा आहे’ अशी टीका केली होती. त्यांचे म्हणणे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खरे करून दाखवले.