Shinde group Jyoti Waghmare's District Collector Kumar Ashirwad controversy viral video
Jyoti Waghmare VS Solapur District Collector : सोलापूर : महाराष्ट्रामध्ये सध्या तुफान पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या पावसाने शेती पूर्णपणे वाहून गेली असून हातातोंडाशी आलेले पीक गेले. शेतकऱ्यांची शेती आणि संसार पाण्याखाली गेल्यामुळे तो हवालदिल झाला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूरमध्ये हृदयद्रावक परिस्थिती असून मदतीचे आवाहन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या ज्योती वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांशी फोन बोलताना त्यांची शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले.
सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी जमीन पाण्याखाली दिली आहे. यामुळे राजकीय नेत्यांचे दौरे सोलापूरमध्ये वाढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोलापूर दौरा केला आहे. सोलापूर जिल्ह्यात सातत्याने राजकीय नेत्यांचे दौरे सुरु असल्यामुले स्थानिक प्रशासनावर मोठा ताण येत आहे. अशाच प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाकणी गावात जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या महिला नेत्या ज्योती वाघमारे यांना खडेबोल सुनावल्याचा प्रसंग घडला आहे. ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकारी यांच्यामधील फोनवरील बोलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाकणी गावामध्ये शिंदे गटाच्या महिला नेत्या ज्योती वाघमारे या मदतीसाठी 200 कीट घेऊन गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या खाण्याच्या सोयीसाठी प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावला आणि त्यांना जाब विचारु लागल्या. यामुळे संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ज्योती वाघमारे यांना चांगलेच सुनावले. तसेच तुमचे हे राजकारण बंद करा असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तुमचे सरकारी अधिकारी मदतीसाठी गावातच नाहीत. गावातील नागरिकांना जेवणाची किट मिळालेली नाहीत. गावाची लोकसंख्या इतकी मोठी आहे, मात्र जेवणाची व्यवस्था का नाही, असा सवाल ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद चांगलेच संतापले. त्यांनी ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. त्यांनी म्हटले की, ‘तुमचं राजकारण नंतर करा. आम्ही मदत पोहोचवतोय पण तुम्ही देखील तुमच्या पक्षाच्या वतीने मदत करा’, असे प्रत्युत्तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यात झालेल्या संवादची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे राजकारण्यांचे पूरग्रस्त भागामध्ये होणारे सातत्याचे दौरे हा चर्चेचा विषय ठरला आहे.