Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSS च्या विजयादशमी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या? चर्चांना जोरदार उधाण

Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमला गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 28, 2025 | 02:26 PM
Chief Justice Bhushan Gavai Mother Kamala Gavai in RSS Program as Chief guest

Chief Justice Bhushan Gavai Mother Kamala Gavai in RSS Program as Chief guest

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
  • संघाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार
  • अमरावतीमधील शाखेमध्ये कमला गवई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित
Kamala Gavai in RSS Program : अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून यंदा देखील विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करणार आहे. यावर्षीचा आरएसएसचा दसरा सोहळा खास असणार आहे. कारण यावर्षी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक आयोजित करण्यात येते त्यावेळी संघाचे विचार सांगितले जातात. तसेच शस्त्रपूजन आणि संचलन देखील केले जाते. संघाच्या अमरावती येथील शाखेने यंदा विजयादशमी उत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कमला गवई यांना निमंत्रण पाठवले.

सध्या देशाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई हे कार्यरत आहे. कमला गवई या त्यांच्या आई आहेत. अमरावती येथील संघाच्या शाखेने त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. कमला गवई या दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाशी नाळ जोडलेली असताना त्या संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता असल्यामुळे जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

5 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या पटांगणात संध्याकाळी 6 वाजता विजयादशमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारणीचे सदस्य आणि प्रज्ञा प्रवाहाचे संयोजक जे. नंदकुमार या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील. तर कमला गवई यांना सुद्धा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. अमरावतीमधील या विजयादशमीच्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

गवई कुटुंबामध्ये आंबेडकरी चळवळीची परंपरा

भूषण गवई हे सध्या देशाचे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीशांचे वडील आणि कमला गवई यांचे पती रा.सू. गवई यांनी विदर्भात रिपब्लिकन पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे. गवई कुटुंब रिपब्लिकन चळवळीशी संबंधित आहेत. कमला गवई आता चक्क भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाण्याची शक्यता असल्याने आंबेडकरी चळवळीत चर्चा होत आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना रा.सू.गवई हे मंत्री होते. ते पवारांचे निकटवर्तीय मानले जात. पुढे ते राज्यपाल झाले. रा.सू.गवई यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र राजेंद्र गवई हे रिपब्लिकन पक्षाची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे कलमा गवई यांचे संघाच्या कार्यक्रमामधील सहभागावरुन चर्चांना उधाण आले आहे

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नागपूरमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे 

विजयादशमी आणि त्यानंतरच्या एका आठवड्यासाठी, जास्तीत जास्त स्वयंसेवक संघाच्या सर्व शाखांमध्ये पूर्ण गणवेशात उपस्थित राहून संघाचे ध्येय स्पष्ट करतील. प्रभाग आणि मंडळ पातळीवर सामाजिक मेळावे आयोजित केले जातील. ब्लॉक पातळीवर सामाजिक सलोखा बैठका घेतल्या जातील. याव्यतिरिक्त, सर्व प्रमुख सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्यक्तींना आमंत्रित करून एक मोठी जाहीर सभा आयोजित केली जाईल. युवा जागृती कार्यक्रम देखील आयोजित केले जातील.दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त नागपूरमध्ये होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करतील. पहिल्यांदाच नागपुरात तीन ‘पथ संचलन’ (स्वयंसेवक परेड) आयोजित केल्या आहेत.

Web Title: Chief justice bhushan gavai mother kamala gavai in rss program as chief guest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • political news
  • RSS
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन
1

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन

काँग्रेसची 200 जागांची यादी सादर; लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा वाढला आत्मविश्वास
2

काँग्रेसची 200 जागांची यादी सादर; लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा वाढला आत्मविश्वास

मोठी बातमी ! मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; ‘त्या’ फोटोमुळे अडचणींत वाढ?
3

मोठी बातमी ! मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; ‘त्या’ फोटोमुळे अडचणींत वाढ?

मोठी बातमी ! खुद्द मुख्यमंत्र्यांनाच विमानतळावर 3 तास रोखले; 50 हजारांचा दंडही ठोठावला
4

मोठी बातमी ! खुद्द मुख्यमंत्र्यांनाच विमानतळावर 3 तास रोखले; 50 हजारांचा दंडही ठोठावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.