कर्जत : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुखांबद्दल आम्हाला आजही तितकाच अभिमान (Pride) आहे, जितका काल होता आणि उद्याही राहणार आहे. आम्ही शिवसैनिक (Shivsainik) आहोत. आम्ही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे आपणास काहीतरी मिळावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकविण्याची गरज नाही (Not Need To Teach Loyalty). स्वत:च्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रायगडात (Raigad) आले असताना आणि हे जिल्ह्याध्यक्ष असूनही एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद (Corporation President) मिळावे यासाठी भर सभेतून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवावी हे हास्यास्पद असल्याचे मत कर्जत-खालापूरचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी व्यक्त केले.
माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांच्या बंडखोर भूमिकेवर टीका केली होती. काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटेल आणि काय तो टेबलावरील डान्स… ज्यांच्यामुळे आपणास आमदार होता आले त्या पक्षप्रमुखाला खुर्चीतून खाली खेचल्याचा नाचून आनंद व्यक्त करणाऱ्यांना लाज कशी वाटली नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार आमदार महेंद्र थोरवे घेतला.
आम्ही शिवसैनिक असल्याने आम्हाला भाड्याचे सल्ले देण्याचा कोणी प्रयत्नही करू नये किंवा करण्याची गरज नाही. आमची पब संस्कृती नाही. तो डान्स शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाल्याबद्दल होता. चुकीचा मेसेज लोकांना सांगून दिशाभूल कराल, तर जनता तुम्हालाच त्याची शिक्षा देईल. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच विजय होणार, असे म्हणत नाव न घेता माजी आमदार सुरेश लाड यांना चिमटे काढले. शिवसेना पक्ष फुटला असे म्हणत आता पुन्हा आमदार होण्याची संधी आपणास प्राप्त झाल्याची स्वप्न पाहणाऱ्या पळपुट्यांनी पुन्हा पक्षाची कास पकडायला सुरुवात केली आहे; परंतु अशा पळपुट्यांना पक्ष पुन्हा उभे करणार नाही हे कुठे यांना माहीत आहे, असेही आमदार थोरवे म्हणाले.