मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण...; विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआघी एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. महायुतीकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. सभा, मोर्चे, बैठका, दौऱ्यांनाही वेग आला आहे. पण यासोबत महायुतीकडून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्यासाठीही महायुतीने प्रयत्न सुरू केले आहेत. यात विशेष बाब म्हणजे, शिवसेना शिंदे गटाने मुंबईमधील उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत जे झाले ते विसरुन जा आणि तीच चूक पुन्हा करू नका, असे म्हणत शिंदे गटाने मुंबईतील उत्तर भारतीयांना साद घातली आहे.
हेही वाचा: बद्धकोष्ठता, लठ्ठपणा, डायबिटीजपासून आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी प्या ‘हे’ पेय
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रासह उत्तर भारतातील जनतेने भाजपला जोरदार दणका दिला होता. भाजपची महत्त्वाची वोटबँक असलेल्या उत्तर भारतीय मतदारांनीच भाजपकडे पाठ फिरवल्याने भाजपचे मोठे नुकसान झाले. तसेच महाराष्ट्रातही झाले.महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांनीही भाजपच्या पारड्यात आपली मते दिली नाहीत. परिणामी उत्तर भारत आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपलामोठे अपयश आले. लोकसभा निवडणुकीत झालेली हीच चूक सुधारण्यासाठी आता शिवसेनेने उत्तर भारतीयांचा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे.
विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांनी आपल्या पारड्यात मते टाकावीत यासाठी शिंदे गटाने त्यांची मनवे वळवण्याची मोहिम सुरू केली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यासाठी नरेश म्हस्के यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. “लोकसभा निवडणुकीत जे उत्तर प्रदेशात झाले ते विसरुन जा आणि तीच चूक आता पुन्हा करु नका, उत्तर भारत आणि महाराष्ट्रात फरक आहे. इथे आमचे सरकार आहे तुम्हाला न्याय नक्कीच न्याय मिळेल,’अशा शब्दांत नरेश म्हस्के यांनी उत्तर भारतीयांना भावनिक साद आवाहन केले आहे.
हेही वाचा: विकत आणायची गरज नाही, या टिप्स फॉलो करून घरीच तयार करा घट्ट दही