उपाशी पोटी 'या' पेयांचे करा सेवन
जगभरातील अनेक रुग्ण वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बद्धकोष्ठता, लठ्ठपणा, डायबिटीज, बीपी इत्यादी आजारांचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. या समस्या वाढू लागल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. पोटातील विषारी पदार्थ बाहेर पाडूंन गेल्यामुळे आणि सतत बाहरेच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाणी प्यावे. ज्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होऊन आजारांपासून शरीर दूर राहील.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. सांधेदुखी, खोकला, किंवा लठ्ठपणा आणि वजन नियंत्रणात राहून आराम मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठता, लठ्ठपणा, डायबिटीजपासून आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे पेय तुम्ही नियमित पिऊ शकता.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: डिटॉक्स करण्यासाठी प्या हे ड्रिंक्स..
सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात गोमूत्र टाकून प्यायल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच हा उपाय नियमित केल्यास तुमचे वाढलेले वजन 1 महिन्यात 5 किलोपर्यंत कमी होऊ शकते. गोमूत्राचे पाणी लठ्ठपणा, टीबी, लिव्हर, बद्धकोष्ठता, किडनी आणि त्वचेच्या रोगांपासून मुक्ती देण्यासाठी प्रभावी आहे.
उपाशी पोटी ‘या’ पेयांचे करा सेवन
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाणी करून त्यात लिंबाचा रस आणि मध टाकून प्यायल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.नियमित या पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच शरीर हायड्रेट राहते. कोमट पाण्यात लिंबू पिळून प्याल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातील आणि पचनक्रिया सुधारेल.
उपाशी पोटी ‘या’ पेयांचे करा सेवन
आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा आवळ्याचा रस टाकून प्यायल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. हा उपाय नियमित केल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होईल, रोगांमुळे शरीराचे नुकसान होणार नाही आणि पचनक्रिया निरोगी राहील. आवळ्यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.
हे देखील वाचा: जेवणानंतर तुम्ही पान खाता! मग जाणून घ्या पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे
उपाशी पोटी ‘या’ पेयांचे करा सेवन
कोरफड खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा, केस आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोरफडचा रस अतिशय प्रभावी आहे. यासाठी ताज्या कोरफडचा रस करून तुम्ही तो नियमित पिऊ शकता. हा रस प्यायल्यामुळे तुमचे पोट, आतडे आणि यकृत निरोगी राहील.