Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होताच शिंदे गटातील आमदार सरवणकर म्हणाले…

गुरूपौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा योग. यादिवशी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूजन करत असत. मात्र, आता ते नाहीत, त्यामुळे साईबाबाच आमचे गुरु आहेत. यानिमित्तानं बाबांच्या चरणी येऊन आशीर्वाद घेतले. शिवसेना-भाजपची युती अभेद राहावी, तसेच महाराष्ट्राल वैभव प्राप्त व्हावं, अशी प्रार्थना केल्याचं सरवणकर यांनी यावेळी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 13, 2022 | 03:10 PM
उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होताच शिंदे गटातील आमदार सरवणकर म्हणाले…
Follow Us
Follow Us:

शिर्डी : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, अशी शिवसेना खासदारांनी गळ घातल्यानं अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात या निवडणुकीच्या निमित्ताने मनोमिलन होण्याची चर्चा रंगली असली तरी मनोमिलनाची आवश्यकता नसून शिवसेना आणि भाजप एकाच विचारधारेचे पक्ष आहेत, असे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी सांगितले.

साईबाबांच्या धुपारतीनंतर माध्यमांशी बोलताना सरवणकर यांनी म्हटले की, गुरूपौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा योग. यादिवशी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूजन करत असत. मात्र, आता ते नाहीत, त्यामुळे साईबाबाच आमचे गुरु आहेत. यानिमित्तानं बाबांच्या चरणी येऊन आशीर्वाद घेतले. शिवसेना-भाजपची युती अभेद राहावी, तसेच महाराष्ट्राल वैभव प्राप्त व्हावं, अशी प्रार्थना केल्याचं सरवणकर यांनी यावेळी सांगितले. तसेच अडीच वर्षात आम्ही हिंदूत्वाची चेष्टा केली असा आरोप आमच्यावर होत होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी मुर्म यांना पाठिंबा देऊन उत्तर दिल्याचं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिर्डीत म्हटलं.

‘मातोश्री’वर जायचं म्हटले तर…

शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात अपात्रेतेची नोटीस बजावली होती. एकीकडे राजकीय संघर्षाला धार आली असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील दोन्ही गटाचं मनोमिलन होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आमदार सरवणकर यांनी म्हटलंय की, ‘मातोश्री’वरुन आमचे नेते एकनाथ शिंदे यांना बोलवणं आलं आणि शिंदे मातोश्रीवर जायचं म्हटले तर कोणीच आमदार विरोध करणार नाही किंवा आडकाठी घालणार नाही, असे देखील आमदार सरवणकर यांनी साई दर्शनानंतर शिर्डीत म्हटलं आहे.

Web Title: Shiv sena and bjp are like minded parties says mla sada sarvankar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2022 | 03:10 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Draupadi Murmu
  • Sada Sarvankar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का
1

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप
2

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
3

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.