पुणे : प्रबाेधनकार ठाकरे यांच्या विचारातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसेना वाढवली. ताेच वारसा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे चालवित आहेत. शिवसेना ही ठाकरे कुटुंबाशिवाय असूच शकत नाही, असा विश्वास शिवसेनेचे शहर प्रमुख संजय माेरे यांनी ‘काॅफी विथ नवराष्ट्र’ या चर्चेच्या कार्यक्रमात व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक आणि मतदार गद्दारांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभुमीवर पुणे शहर प्रमुख संजय माेरे यांनी आगामी महापािलका निवडणुक आणि संघटनात्मक बांधणीसंदर्भात आपली मते खुलेपणाने मांडली. ते म्हणाले, शिवसेना म्हणजेच ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना हाेय. आजपर्यंत अनेक जणांची शिवसेनेने राजकीय कारकिर्द घडविली. सगळे दिले परंतु त्यांनी गद्दारी केली. पण नंतर त्यांचे काय झाले हे सर्वज्ञात आहे. नुकत्याच झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर पुण्यातील माेजके शिंदे गटात सहभागी झाले. ते केवळ वैयक्तिक संबंधातून तिकडे गेले आहेत. मला त्यांच्याविषयी काही बाेलायचे नाही, परंतु या निमित्ताने शिवसैनिक पुन्हा एकदा जाेरात कामाला लागला आहे, असं मोरे म्हणाले.
जनतेला रुचले नाही
काेराेनाच्या संकटकाळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख या नात्यानेच काम केले. त्या कामाची दखल सर्वाेच्च न्यायालय, निती आयाेग, केंद्र सरकारनेही घेतली. तसेच धारावी सारख्या झाेपडपट्टीत काेराेना नियंत्रणात ठेवण्याची त्यांची कार्यपद्धतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर काैतुक केले गेले. यामुळे उद्धव ठाकरे यांची लाेकप्रियता वाढली. हीच लाेकप्रियता विराेधकांना धाेकादायक वाटू लागली हाेती. काेराेनानंतर दाेन गंभीर शस्त्रक्रीयांना उद्धव ठाकरे यांना सामाेरे जावे लागले. याचवेळी विराेधक आणि शिवसेनेतील गद्दारांनी संधी साधली. ज्या पद्धतीने राज्यात सत्तांतर घडविले गेले. ते शिवसैनकीच नाही, तर राज्यातील जनतेलाही रुचले नाही. हे येणाऱ्या निवडणुकीत जनता निश्चितच दाखवून देईल, असे माेरे यांनी सांगीतले.
पालीकेच्या कारभाराची चाैकशी करणार का ?
मुंबई महापालिकेच्या कारभाराची ‘कॅग’ मार्फत चाैकशी करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने आता राज्यातील सर्वच महापािलकांच्या कारभाराची चाैकशी करावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आंदाेलनही केले आहे. पुणे महापािलकेतील सत्ताधारी भाजपने समान पाणी पुरवठा याेजना, सुरक्षा रक्षक पुरविणे, महापालिकेच्या मिळकती विक्रीला काढणे, जायका आणि नदी सुधार प्रकल्प आदी याेजनेत माेठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. न केलेल्या कामांची बिले ही काढली गेली आहेत. या कारभाराचीही चाैकशी झालीच पाहीजे, असे माेरे म्हणाले.
संघटन मजबूत, समन्वय वाढविणार
पुण्यातील शिवसेनेचं संघटन मजबूत आहे. ते आणखी वाढविणार आहोत. गटप्रमुखापर्यंत नियुक्त्या झाल्या आहेत. युवा सेना, महीला आघाडी यांच्याही नियुक्त्या झालेल्या आहेत. सध्या युवती सेना वाढविण्यावर आमचा भर आहे. शिवसेनेकडे युवतींना आकर्षित केले जात आहे. शिवसेनेच्या अंगीकृत संघटना असलेल्या स्थानिक लाेकाधिकार समिती, कामगार सेना आदींचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी शहर पातळीवरील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समन्वय वाढविला जात आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांचेही सहकार्य घेतले जात आहे. त्याचवेळी साेशल मिडीया विभागही कार्यरत असून, त्यास अधिक बळकटी दिली जात आहे, असे माेरे म्हणाले.
[read_also content=”शाॅक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/three-people-from-the-same-family-died-due-to-shock-nrdm-322177.html”]
स्वबळावर लढण्याची तयारी
शिवसैनिक हा धनदांडगा नाही, ताे सर्व सामान्य कुटुंबातीलच आहे. आमच्याकडे पैसा नाही पण निष्ठावंताची संख्या भरपूर आहे. याच शिवसैनिकांच्या बळाच्या जाेरावर आम्ही महापालीकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. महािवकास आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय हाेईल. पक्षप्रमुख जाे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुक लढवू. आगामी महापालीका निवडणुकीत शिवसेनेच्या आजपर्यंतची सर्वाेच्च कामगिरी नाेंदवून जास्त जागा निवडून येतील. पुण्याचा महापाैर ठरविताना, निश्चितचं शिवसेना निर्णायक ठरेल. असंही यावेळी बोलतांना संजय मोरे म्हणाले.