Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याच्याराचा सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध !

बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाने निषेध करत वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 10, 2024 | 10:00 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेधाचे फलक झळकावत बांग्लादेश सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच हिंदूंच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.

Nana Patole : ‘…तर आम्ही राजीनामा द्यायला तयार’; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान

या निवेदनात म्हटले आहे कि, बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर देखील अमानविय पद्धतीने अत्याचार होत आहेत. हि बाब अत्यंत दुःखदायक असून सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,संघटक बबन बोभाटे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,उपनेत्या जान्हवी सावंत यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

बांग्लादेशात अल्पसंख्य समुदायावर अत्याचार

बांग्लादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांग्लादेशामध्ये अल्पसंख्य समुदाय, विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली. या घटनेचे पडसाद उमटले आहेत. भारत, ग्रेट ब्रिटन आणि इतर अनेक देशांनी बांग्लादेशातील या घटनांची कठोर शब्दामध्ये निंदा केली आहे. भारतामध्ये निर्वासित जीवन जगत असलेल्या शेख हसीना यांनी देखील सध्याच्या युनूस सरकारवर जोरदार घणाघात केला. त्यांनी या बाग्लादेशातील सरकारला “नरसंहारक” संबोधत अल्पसंख्यांकविरोधी धोरणांचा निषेध केला आहे.

बांग्लादेशाला वाचवणाऱ्या भारताला शत्रू ठरवले जात आहे तर लाखो लोकांची हत्या आणि छळ करणाऱ्या पाकिस्तानला मित्र समजले जात आहे. असा हल्लाबोल बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी युनूस सरकारवर केला आहे.

या अत्याचारांविरोधात येत्या काही दिवसातच  बांग्लादेश दूतावासावर मोठा निषेध मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. या मोर्चामध्ये भारतातील 200 हून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागरिक समाजाच्या सदस्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. राज्यातही विविध ठिकाणी बांग्लादेशातील अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला जात आहे.

Web Title: Shiv sena thackeray group protests atrocities against hindus in bangladesh in sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 09:58 PM

Topics:  

  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
2

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
3

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
4

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.