Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

एआय किंवा फोटो एडिटिंग तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र चुकीच्या संदर्भात प्रसारित करणे गंभीर बाब असून, समाजमाध्यमांवर अशा प्रकारे बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 09, 2026 | 09:27 AM
AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

Follow Us
Follow Us:

सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र एआयच्या माध्यमातून मॉर्फ करून ते साताऱ्यातील एका नृत्य कार्यक्रमाशी जोडल्याचा आरोप झाल्याने मंगळवारी साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. संबंधित छायाचित्रांचा प्रत्यक्ष कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करत राजे समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजपचे गटनेते अविनाश कदम यांच्यासह समर्थकांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधित यूट्यूब चॅनेलविरोधात तक्रार दाखल केली.

संबंधित यूट्यूब चॅनेलवरून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र कथितरीत्या संपादित करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमधील छायाचित्रे एकत्र करून त्यांना चुकीचा संदर्भ देण्यात आला असून, हा प्रकार राजकीय बदनामीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित पोस्टची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राजे समर्थकांनी पोलिस ठाण्यात जोरदार भूमिका मांडली.

एआय किंवा फोटो एडिटिंग तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र चुकीच्या संदर्भात प्रसारित करणे गंभीर बाब असून, समाजमाध्यमांवर अशा प्रकारे बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी संबंधित प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील स्थान, छत्रपती घराण्याचा वारसा तसेच विकासकामांबाबतची त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे. अशा व्यक्तीचे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने प्रसारित करून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत धडा मिळाला पाहिजे, अशी भूमिका कदम यांनी मांडली.

दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून, संबंधित पोस्ट, छायाचित्रे आणि त्यामागील परिस्थितीची चौकशी सुरू केली आहे. एआयच्या माध्यमातून छायाचित्रात नेमका कोणता फेरफार करण्यात आला, पोस्ट कोणी तयार केली आणि ती समाजमाध्यमांवर कोणी प्रसारित केली, याचा तपास झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Maratha Reservation : ‘एकही मागणी मान्य नाही’; जरांगे पाटलांचा सरकारवर घणाघात, भरत गोगावलेंनाही थेट इशारा

दरम्यान, चुकीच्या अथवा मॉर्फ केलेल्या छायाचित्रांना पुढे प्रसारित न करता संबंधित समाजमाध्यम खात्यांना ‘रिपोर्ट’ आणि ‘ब्लॉक’ करण्याचे आवाहन राजे समर्थकांनी केले आहे.

Web Title: Shivendrasinhraje supporters aggresive in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Satara Politics
  • Shivendra Raje Bhosale
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

पुणे विभागात पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत; मतदारसंघांत महायुतीच बाजी मारणार, शिवेंद्रसिंहराजेंचा दावा
1

पुणे विभागात पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत; मतदारसंघांत महायुतीच बाजी मारणार, शिवेंद्रसिंहराजेंचा दावा

Satara DCC Bank Election: दहा वर्षांच्या निकषाचा राजकीय बॉम्ब! उदयनराजे, नितीन पाटलांची माघार; काका धुमाळांची बिनविरोध बाजी
2

Satara DCC Bank Election: दहा वर्षांच्या निकषाचा राजकीय बॉम्ब! उदयनराजे, नितीन पाटलांची माघार; काका धुमाळांची बिनविरोध बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.