Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यापुढे फार मोठा पेच…’

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर आमच्यापुढे फार मोठा पेच निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाला काय तोंड दाखवणार? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2024 | 12:55 PM
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यापुढे फार मोठा पेच…’
Follow Us
Follow Us:

मुंबई : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे (Ashok Chavan Resignation) आगामी निवडणूकींपूर्वी महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण कोणत्या पक्षात जाणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली असताना चव्हाण यांनी आपण भाजपमध्ये जाणार (Ashok Chavan Join BJP) असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर आमच्यापुढे फार मोठा पेच निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आता देशाला काय तोंड दाखवणार? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, आमच्यापुढे फार मोठा पेच निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाला काय तोंड दाखवणार? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. कारण महाराष्ट्र भाजपाने मोदींच्या शिरपेचात खोटेपणाचा आणखी एक तुरा रोवला आहे. मोदी यांनी नांदेडला जाऊन कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या भूखंड प्रकरणात अशोक चव्हाणांनी कसा घोटाळा केला याची माहिती दिली होती. चव्हाणांनी शहिदांचा कसा अपमान केला हे स्वतः मोदी यांनी नांदेडला येऊन सांगितलं होतं. तेच मोदी आता देशाला काय तोंड दाखवणार? भाजपाने शहिदांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्रात आंदोलन केलं होतं. त्या शहिदांच्या अपमानाचं आता काय झालं? अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन भाजपावाल्यांनी शहिदांचा तो अपमान धुवून काढला का?  असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

कुठे नेऊन ठेवलीय भाजपा माझी? असा प्रश्न विचारण्याची परिस्थिती

पुढे संजय राऊत म्हणाले, “मला वाटतं सगळ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपाने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा आता बदलली पाहिजे. कारण त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलं आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता आपल्या पक्षात घेऊन शुद्धीकरण मोहीम चालवली आहे. काँग्रेसबरोबर थेट युती करायचं टाळून भाजपावाले अशा प्रकारे काँग्रेसशी युती करत आहेत. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून 400 पार उडी मारता येईल असं त्यांना वाटतं. परंतु, मला वाटतं, भाजपा अशा पद्धतीने 200 पारदेखील जाणार नाही. कुठे नेऊन ठेवलीय भाजपा माझी? असा प्रश्न विचारायची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. महात्मा गांधी यांचं काँग्रेसचं शुद्धीकरण करण्याचं स्वप्न भाजपाने स्वीकारलं आहे असं दिसतंय.” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

Web Title: Shivsena mp sanjay raut reaction to ashok chavan bjp entry he said we have a big problem nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2024 | 12:55 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • MP Sanjay Raut
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
4

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.