"भारत पाकिस्तान सामना देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू", उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल (फोटो सौजन्य-X)
uddhav thackeray on Ind vs Pak Asia Cup matches : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला तीव्र विरोध केला आहे. अलिकडच्या दहशतवादी कारवाया लक्षात घेऊन सामना रद्द करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अमेरिकेत बनवलेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांनी आठवण करून दिली की त्यांनी सामना रद्द करण्यासाठी बीसीसीआय अध्यक्षांना पत्र लिहिले होते, कारण पाकिस्तानी क्रिकेटपटू अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर भारत आणि ऑपरेशन सिंदूरचा अपमान करताना आढळले आहेत.
याचदरम्यान आता आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरुन सध्या विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. आता या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भारत पाकिस्तान सामना ही देशभक्तीची थट्टा आहे. देशभक्तीचा व्यापार सुरू आहे. त्यांना व्यापारापुढे देशभक्तीचं काही पडलं नाही, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (13 सप्टेंबर) मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तान सामन्या विरोधात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारताचा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा उल्लेख केला. त्यावेळी नीरज चोप्रा हा पाकिस्तानी प्रशिक्षक होता. त्यांनी नीरज चोप्राला अंधभक्तांनी देशद्रोही म्हटले.
उद्या भारत आणि पाकिस्तान सामना आहे. पहलगाममध्ये भारतीयांवर हल्ला झाला. त्यात मारल्या गेलेल्या पर्यटकांची हत्या झाली त्यांचे रक्त सुकलं नाही, घाव भरले नाही. आपल्या सर्वांन वाटलं होतं की पाकिस्तानचे आपण दोन तीन चार तुकडे करू. त्यांना जागेवकर ठेवणार नाही. त्यादृष्टीने आपण चढाई केली होती, युध्द केलं, त्याला नावलं ठेवलं होतं ऑपरेशन सिंदूर मधल्या काळात आपल्या संरक्षण मंत्र्यांने सांगितलं की ऑपरेशन सिंदूर थांबलं नाही. काही काळाने पाकिस्तान हल्ले करतो. आपण तेव्हा जागे होतो. सरकारही चवताळल्यासारखे वागते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ट्रम्प म्हणाले की युद्ध थांबवलं, व्यापारासाठी थांबवलं. नीरज चोप्रा त्यावेळी पाकिस्तानी प्रशिक्षकाला बोलावलं होतं. त्या नीरज चोप्राा अंझभक्तांनी देशद्रोही म्हटले. त्यांना पश्चात्तापाची कल्पनाही करता येत नाही. चला पाकिस्तानशी युद्ध पुकारूया आणि त्याच्यासोबत क्रिकेट खेळूया. अशी अचानक कारवाई, असा प्रश्न उद्धव ठाकरेंकडून आला. तसेच देशभक्तीचा व्यापार सुरू आहे. यांना व्यापारापुढे देशभक्तीचं काही पडलं नाही. राजनाथ सिंह आणि अमित शाह यांना विचारायचं की ऑपरेशन सिंदूर तुम्ही थांबवलं असं म्हणणार आहात का. ज्यांनी ज्यांनी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले, अगदी सोफियान कुरेशी यांनाही ट्रोल केलं. भारताचे अंधभक्त त्यांना पाकिस्तानची बहीण म्हणाले होते. आता त्या गधड्यांचं काय करणार. तुमची पाकिस्तान बाबतची आता भूमिका काय आहे, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारले.