Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : पाकिस्तानविरुद्ध भारताच्या संघाची कशी असेल प्लेइंग 11? अर्शदीपचे होणार पुनरागमन तर या खेळाडूला वगळणार

भारताने आपल्या पहिल्या सामन्यात यूएईचा पराभव केला तर पाकिस्तानने ओमानचा पराभव केला. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जिंकणारा संघ सुपर-४ कडे वाटचाल करेल, तर पुढचा सामना पराभूत संघासाठी महत्त्वाचा ठरेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 13, 2025 | 03:14 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय

फोटो सौजन्य - बीसीसीआय

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२५ चा सहावा सामना रविवार, १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मागील अनेक महिन्यापासून चर्चेत असलेला सामना आता काही तासामध्ये सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर आता भारताचा संघ पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना 14 तारखेला म्हणजेच उद्या होणार आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही संघांनी आपला पहिला सामना खेळला आहे.

भारताने आपल्या पहिल्या सामन्यात यूएईचा पराभव केला तर पाकिस्तानने ओमानचा पराभव केला. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जिंकणारा संघ सुपर-४ कडे वाटचाल करेल, तर पुढचा सामना पराभूत संघासाठी महत्त्वाचा ठरेल. भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या रूपात फक्त एकच वेगवान गोलंदाज घेऊन यूएईविरुद्ध आला होता, त्यामुळे अर्शदीप सिंग पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करू शकतो याची पूर्ण शक्यता आहे. अशा परिस्थितीत, कोणाला वगळले जाईल ते जाणून घेऊया –

Asia Cup 2025 : ओमानने केला पाकिस्तानचा पर्दाफाश! India vs Pakistan सामन्यापूर्वी शेजारी चिंतेत, जाणून घ्या नक्की कारण काय?

सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर या जोडीने युएईविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती हे तीन फिरकीपटू मैदानात उतरवले होते. कुलदीप यादवने अशी कामगिरी केली की आता कोणीही त्याला वगळण्याचा विचारही करू शकत नाही. युएईविरुद्ध त्याने चार विकेट घेतल्या. पहिल्या सामन्यामध्ये अर्शदीपला खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे आता प्लेइंग 11 मध्ये दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

The RIVALRY of all rivalries 🇮🇳🇵🇰
The GREATEST CLASH in cricket 🔥

𝐈𝐍𝐃𝐈𝐀 𝐯𝐬 𝐏𝐀𝐊𝐈𝐒𝐓𝐀𝐍 – tomorrow, 7 PM onwards, LIVE on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 #INDvPAK pic.twitter.com/BGqNeg33It

— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 13, 2025

अशा परिस्थितीत, अर्शदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये बसवण्यासाठी अक्षर पटेल किंवा वरुण चक्रवर्ती यापैकी एकाला वगळावे लागू शकते. अक्षर पटेल खालच्या फळीत फलंदाजी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेची सर्वांनाच जाणीव आहे. अशा परिस्थितीत वरुण चक्रवर्तीला अंतिम अकरामधून वगळण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसते. जर संघ व्यवस्थापनाने अक्षर पटेलला बाहेर ठेवले तर भारतीय फलंदाजीत फारशी खोली राहणार नाही, अशा परिस्थितीत फलंदाजांवर अधिक दबाव येईल.

पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ कसा असू शकतो?

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल/वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह

Web Title: Asia cup 2025 what will be the playing 11 of indias team against pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • India vs Pakistan
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘भारत आम्हाला पराभूत करण्यासाठी..’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी Shoaib Akhtar ने केला मोठा खुलासा  
1

Asia cup 2025 : ‘भारत आम्हाला पराभूत करण्यासाठी..’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी Shoaib Akhtar ने केला मोठा खुलासा  

India vs Pakistan 2025: भारत-पाकिस्तान सामन्यावर शनि आणि मंगळाची सावली, जाणून घ्या ज्योतिषाचे भाकीत
2

India vs Pakistan 2025: भारत-पाकिस्तान सामन्यावर शनि आणि मंगळाची सावली, जाणून घ्या ज्योतिषाचे भाकीत

Asia cup 2025 : ‘BCCI सरकारच्या निर्णयाशी…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, फलंदाजी प्रशिक्षकाने केला मोठा दावा 
3

Asia cup 2025 : ‘BCCI सरकारच्या निर्णयाशी…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, फलंदाजी प्रशिक्षकाने केला मोठा दावा 

BAN vs SL Pitch Report : आज अबू धाबीच्या खेळपट्टीची स्थिती कशी असेल, फायदा कोणाला मिळणार? जाणून घ्या
4

BAN vs SL Pitch Report : आज अबू धाबीच्या खेळपट्टीची स्थिती कशी असेल, फायदा कोणाला मिळणार? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.