Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neelam Gorhe : ‘मांडवलीसाठी नीलम गोऱ्हेंनी 25 लाख मागितले’, ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

नवी दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 24, 2025 | 10:33 PM
'मांडवलीसाठी नीलम गोऱ्हेंनी 25 लाख मागितले', ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

'मांडवलीसाठी नीलम गोऱ्हेंनी 25 लाख मागितले', ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

Follow Us
Follow Us:

नवी दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गोऱ्हेंवर पलवटवार केला होत. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गोऱ्हेंवर गंभीर आरोप केला आहे. देशमुख हे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरचे आमदार आहेत.

काय म्हणाले देशमुख?
अकोला महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा उल्लेख करत देशमुख म्हणाले की, येथील तत्कालीन विधान परिषदेचे जे आमदार होते, त्यांनी अकोला महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात विधान परिषदेत आवाज उचलला होता. त्यावेळी स्वत: नीलम गोऱ्हे यांनी हा प्रश्न दडपण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

नीलम गोऱ्हेंनी आपल्याला बोलावत या प्रकरणात मांडवली करण्याचा प्रस्ताव दिल्याचं देशमुख यांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. आपण गोऱ्हे यांच्या प्रस्तावाला विरोध करत नकार दिला होता. त्या प्रश्नाचं पुढं काय झालं हे माहिती नाही, असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं आहे.

एखाद्या आमदारानं प्रश्न मांडल्यानंतर कसा पैसा घ्यायचा आणि त्यामधून भ्रष्टाचाऱ्यांना कसं संरक्षण द्यायचं याचं जीवंत उदाहरण अकोला महापालिकेचं आहे, असा दावा देशमुख यांनी केला.

यापूर्वी नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनातील कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर खळबळजनक आरोप केला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं, तर गल्ला गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेंना दिल्याचा गंभीर आरोप गोऱ्हे यांनी केला होता.

“हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”

“हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं आहे.“शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी जर उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज गाड्या दिल्या असतील तर कोणत्या क्रमांकाच्या दिल्या ते त्यांनी सांगितलं पाहिजे. खरं तर नीलम गोऱ्हे यांच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत. त्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलल्या म्हणून मी बोलत नाही. मात्र, कोणत्याही नेत्यांना कोणत्याही नेत्यांच्या विरोधात बोलायचं असेल तर काही संदर्भ किंवा काही पुरावे दिले पाहिजेत. पण कोणतेही पुरावे न देता आपण बोलत असू तर ते योग्य नाही”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Web Title: Shivsena ubt mla nitin deshmukh serious allegations on neelam gorhe of bribery latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 10:27 PM

Topics:  

  • Dr. Nilam Gorhe
  • Maharashtra Politics
  • ubt shiv sena

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.