Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सची माहिती मिळाली, फडणवीसांनी दिली तपासाची माहिती

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार विमान अपघात प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळाल्याचे सांगत एआयबी आणि सीआयडीकडून तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jul 10, 2026 | 07:24 PM
अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सची माहिती मिळाली, फडणवीसांनी दिली तपासाची माहिती

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सची माहिती मिळाली, फडणवीसांनी दिली तपासाची माहिती

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार विमान अपघात प्रकरणात ब्लॅक बॉक्सची माहिती रिकव्हर
  • सीआयडी आणि एआयबीकडून समांतर तपास सुरू
  • अंतिम अहवालानंतरच पुढील कारवाई; फडणवीसांची माहिती
 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती देत तपासाची सद्यस्थिती सभागृहासमोर मांडली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सीआयडी आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) या दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू आहे. काही सदस्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असली तरी एआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीआयडी आणि एआयबीकडून समांतर तपास सुरू

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सीआयडीने तपासादरम्यान पायलट सुमित कपूर यांच्यावर संशयाच्या अनुषंगाने चौकशी केली. त्यांच्या सर्व बँक खात्यांची तपासणी करण्यात आली, मात्र कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळले नाहीत. सीबीआय चौकशीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, एआयबीचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा असून त्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल.

‘मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं’; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर; अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी अपेक्षित

फडणवीस यांनी सांगितले की, विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील सर्व आवश्यक माहिती यशस्वीरीत्या रिकव्हर करण्यात आली आहे. प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सामान्यतः अशा अहवालांना तीन ते चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, केंद्र सरकारने हा अहवाल दिवंगत नेत्यांच्या पुण्यतिथीपूर्वी सादर करण्याची विनंती संबंधित यंत्रणेला केल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘भावना महत्त्वाची, पण कायदा पुराव्यांवर चालतो’

मुख्यमंत्री म्हणाले, “भावना महत्त्वाची आहे, पण कायदा भावनेने चालत नाही.” एआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच दोषी कोण, याचा निर्णय घेता येईल. पुरेशा पुराव्यांशिवाय कारवाई केल्यास ती न्यायालयात टिकणार नाही, त्यामुळे सरकार अंतिम अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मिसिंग लिंक’वरून विधान परिषदेत राडा! खोटे आरोप करणारे महाराष्ट्राचे शत्रू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात

त्यांनी पुढे सांगितले की, कर्नाटकमध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. अंतिम अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.

Web Title: Devendra fadnavis ajit pawar plane crash investigation black box update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Monsoon Session
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.