पुणे : पुण्यातील आळंदीमध्ये गीत- भक्ती अमृत महोत्सव(Geet- Bhakti Amrut Mahotsav) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी मधुरेतील (madhura) कृष्ण जन्मभूमीबद्दल (Krishna Janmabhoomi) व काशीबद्दल (Kashi) सूचक वक्तव्य केले. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना जोरदार टोला लगावला आहे.
अयोध्येच्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर मधुरेतील कृष्णजन्म भूमी तसेच ज्ञानवापी मशीदचा मुद्दा प्रकार्शाने समोर आला आहे. फडणवीस म्हणाले, “आयोध्या काशी आणि मथुरा ही ठिकाणे अत्यंत पवित्र आहेत. ज्या पद्धतीने राम जन्मभूमी निर्माण झाली, त्या पद्धतीने मथुरा येथे कृष्ण मंदिर निर्माण व्हावे ही लोकांची अपेक्षा आहे. मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत राम मंदिर निर्माण झाले. त्याच पद्धतीने श्रीकृष्ण मंदिर सौहार्दपूर्ण वातावरणात निर्माण होईल,” असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यानंतर आता भाजप या मधुरा व काशीच्या मंदिराबाबत सक्रिय होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
? 11.45am | 11-2-2024 ? Pune | स. ११.४५ वा. | ११-२-२०२४ ? पुणे.
LIVE | Media interaction.#Maharashtra #Pune https://t.co/ZhWbhzv6VG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 11, 2024
तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि पुणे पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला होता. ‘पुणे पोलिसांनी गुंडांची परेड काढली तशीच वागळेंवर हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची काढावी’, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर कोण संजय राऊत असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, “कोण संजय राऊत? ते काय मोठे नेते आहेत का? मोठे नेते असतील तर मला विचारा” अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली.