Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’; समितीकडून CM Relief Fund ला 1 कोटींची मदत

राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 15, 2025 | 09:06 PM
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’; समितीकडून CM Relief Fund ला 1 कोटींची मदत
Follow Us
Close
Follow Us:
राज्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान 
राज्य सरकारने जाहीर केले 31 हजार कोटींचे पॅकेज 
अतिवृष्टीने शेट पिकांचे मोठे नुकसान 
मुंबई: राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले होते.

या आवाहनास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने शासनाची मंजुरी घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयाच्या मदतीचा धनादेश दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जमा केल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर मंदिर निधीच्या वतीने पंढरपूर देवस्थान समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!… pic.twitter.com/PI2ICxhA6O — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 14, 2025

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अभिजीत पाटील, मंदिर समितीच्या सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड माधवीताई निगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतला. हजारो हेक्टर जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने २२०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली होती. आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही मदत जाहीर केली.

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बुजलेल्या विहींरींसाठी ३० हजार रुपये दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे पिकांवर मुलाप्रमाणे प्रेम असते. शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला आहे. दिवाळीआधी मदत देण्याचा प्रयत्न असणार आहे. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी  ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे. २९  जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उभारली जाणार आहेत. बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० रुपये प्रती हेक्टरी मदत केली जाणार आहे.

Web Title: Shri vitthal rukmini temple committee help 1 crore to cm relief fund for farmers crop damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 09:06 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Crop damage
  • Pandharpur Vitthal Rukmini Temple

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी घेतला ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ चा आढावा; म्हणाले, “मुंबईमध्ये…”
1

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी घेतला ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ चा आढावा; म्हणाले, “मुंबईमध्ये…”

कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’; कृषी भवनासाठी तब्बल 35.31 कोटींचा निधी मंजूर
2

कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’; कृषी भवनासाठी तब्बल 35.31 कोटींचा निधी मंजूर

भिडे गुरुजी अन् मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा; पुण्यातल्या बैठकीत काय ठरले? फडणवीस म्हणाले…
3

भिडे गुरुजी अन् मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा; पुण्यातल्या बैठकीत काय ठरले? फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…
4

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.