गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः कहर केला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतल्याचे पाहायला मिळाले.
नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, विशेषतः नगदी पीक असलेल्या कांदा आणि उन्हाळी टोमॅटो यांना याचा मोठा फटका बसला आहे.