Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फलटणच्या श्रीराम कारखान्याबाबत मोठा निर्णय; जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द होणार? 18 मे रोजी फैसला

फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्रातील आघाडीची संस्था असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत एक अपडेट समोर आली आहे. कारखान्याचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला भागीदारी करार मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली असून, या संदर्भात चर्चा करण्यासाठी कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 16, 2026 | 07:19 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Satara news : फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्रातील आघाडीची संस्था असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत एक अपडेट समोर आली आहे. कारखान्याचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला भागीदारी करार मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली असून, या संदर्भात चर्चा करण्यासाठी कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे.

१८ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन

श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. फलटण यांच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभेची अधिकृत नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अत्यंत महत्त्वाची सभा सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी दुपारी ठीक १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. श्री. बाळासाहेब पंढरीनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर ही सभा पार पडणार आहे. कारखान्याच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय या सभेत घेतले जाणार असल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जवाहर कारखान्यासोबतचा भागीदारी करार रद्द होणार?

या विशेष सभेपुढील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी-यळगुड येथील प्रसिद्ध ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना ली.’ यांच्यासोबत झालेला भागीदारी करार रद्द करणे हा आहे. श्रीराम कारखान्याचा जवाहर कारखान्यासोबत ९ मार्च २०२२ रोजी भागीदारी करार झाला होता. मात्र, हा करार रद्द करण्याबाबत आता पत्र आले असून, या पत्रावर सभेमध्ये सविस्तर विचारविनिमय आणि चर्चा केली जाणार आहे. हा करार रद्द झाल्यास श्रीराम कारखान्याच्या पुढील वाटचालीची दिशा बदलू शकते.

नवीन भागीदार किंवा खाजगीकरणावर होणार चर्चा

भागीदारी करार रद्द करण्याच्या विषयासोबतच कारखान्याला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी इतर पर्यायांवरही चाचपणी केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ८ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार आणि स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) नुसार कारखाना, अर्थसाहाय्य आणि देशी-विदेशी मद्य विभाग चालवण्याबाबत या सभेत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. हा कारखाना यापुढे सहकारी अथवा खाजगी कारखान्यांच्या सहकार्य तत्त्वावर कसा चालवायचा, यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन

कारखान्याच्या भविष्यातील दृष्टीने ही सभा अत्यंत निर्णायक ठरणार असल्याने, सर्व सन्माननीय सभासदांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी केले आहे. तसेच, या सभेस उपस्थित राहणाऱ्या विविध संस्थांनी आपल्या अधिकृत प्रतिनिधींचे नाव १५ मे २०२६ पूर्वी कारखान्याकडे लेखी स्वरूपात पाठवणे बंधनकारक असल्याचेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आता १८ मे रोजी होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण फलटण आणि लोणंद परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Shriram sakhar karkhana phaltan special general meeting may 18 partnership cancel marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
4

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.