Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात; शंभूराज देसाईंची सावध भूमिका

सातारा पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चांमध्ये पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सावध भूमिका घेतली आहे. पालकमंत्रिपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, तो निर्णय मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Aug 17, 2026 | 09:40 PM
Shambhuraj Desai (Photo Credit - X)

Shambhuraj Desai (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सावधपणे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका देसाई यांनी मांडली. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. त्यांच्या अधिकारकक्षेबाबत भाष्य करणे मला उचित वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

साताऱ्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असतानाच देसाई यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या संभाव्य रस्सीखेचीत थेट भूमिका न घेता त्यांनी निर्णयाचा चेंडू महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात टाकला आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणावरून महायुतीतील घटकांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांबाबतही देसाई यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये यासंदर्भात बैठक झाल्याचे सांगितले. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे जाहीर करणे उचित ठरणार नाही. मात्र, बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच संबंधित वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले होते, असे देसाई यांनी नमूद केले.

रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची ‘सस्पेन्स’ अखेर संपली; ‘या’ दोन मातब्बर नेत्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी

महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण महायुती धर्माचे पालन करीत असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत कितीही तर्कवितर्क सुरू असले तरी वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय हाच आपल्यासाठी अंतिम राहणार असल्याचा संदेश त्यांच्या वक्तव्यातून मिळाला.

दरम्यान, सातारा पालकमंत्रिपदाची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपविली जाणार, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. देसाई यांनी स्वतःहून कोणतीही दावेदारी किंवा अपेक्षा व्यक्त न करता अत्यंत सावध भूमिका घेतल्याने पालकमंत्रिपदाच्या चर्चेला आणखी वेग आला आहे. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात, याकडे साताऱ्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजपचा जल्लोष; ‘निर्लज्ज लोक’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

Web Title: Slug satara guardian minister shambhuraj desai mahayuti decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.