संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच संघटना एकवटली
Beed Santosh Deshmukh case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. देशमुखांच्या आरोपांना तातडीने अटक करण्यात यावी. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या मागणीसह आज सकाळी 10 वाजल्यापासून बीड शहर वासीयांकडून मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. बीडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर सर्वपक्षीय मूक मोर्चा काढला जाणार आहे.
संतोष देशमुख्यांच्या हत्येच्या विरोधात बीडमध्ये काळे कपडे आणि काळ्या फिती लावून मुक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चानिमित्त शहरातील चार मार्गांवरील वाहतून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मोर्चातील हालचालींवरही ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यासोबत 74 पोलिस अधिकाऱ्यांसह 350 हून अधिक पोलिसांचा फौजफाटाही या मोर्चासाठी तैनात करण्यात आला आहे.
Manmohan Singh’s funeral: अलविदा सरदारजी….! मनमोहन सिंग यांना शेवटचा निरोप
सरपंच पती संतोष देशमुख यांची हत्या होऊन १८ दिवस उलटले, तरी यातील सुदर्शन घुलेसह तिघे जण अजूनही मोकाटच आहेत. या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध घेण्यात सीआयडीला अपयश आलेले आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड या चार जणांना अटक करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. परंतु दिलेल्या चार दिवसांत पोलीस चारही आरोपीला अटक करू शकले नाहीत. त्यामुळे दिलेला अल्टिमेटम संपल्यामुळे आज सर्वपक्षीय मोर्चा निघत आहे.
या सर्वपक्षीय मुक मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांची मुले व पत्नी सहभागी होतील. दिवंगत देशमुख यांची मुलगी वैभवी, भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, इत्यादी नेते या मोर्चातसहभागी होणार आहेत.
Badalpur Crime: महाराष्ट्रात काय चाललंय काय? पुण्यानंतर आता बदलापुरात 19 वर्षीय
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा धनंजय मुंडे यांच्याविरोधात संपूर्ण बीडमध्ये वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी बीडमधून जोर धरू लागली आहे. तर विरोधी पक्ष नेत्यांसह आता भाजपमधील नेत्यांनी धनंजय मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजप नेते सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडेंवर गंभीर आरोपही केले आहेत.
दरम्यान, कालदेखील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या न्यायासाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे. बीडमधील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग होता. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी व त्यांचा मुलगा हे देखील या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. मुलगी वैभवी हिने केलेल्या भाषणामुळे उपस्थित लोक देखील भावूक झाले होते.