बदलापूर : बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला.
पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला.
पुण्यात धक्कादायक प्रकार! राजगुरुनगरमध्ये दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करुन केली हत्या
याप्रकरणी तिने 23 डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 12 तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या. पोलीस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. तर त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राजगुरूनगर येथे वाडा रोडवर दोन लहान मुलींवर अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दोन सख्या बहिणींवर अत्याचार करून त्यांना पाणी भरण्याच्या ड्रममध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार शहरातील वाडा रस्त्यावरील मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी गुरुवार (दि. २६) रोजी उघडकीस आला.
Todays Gold Price: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात उसळण, चांदीही महागली
नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत, तेथून जवळच असलेल्या एका बिअर बारमध्ये काम करीत असलेल्या परप्रांतीय मुलांच्या खोलीत मुलींचे मृतदेह पोलिसांना आढळून आले. या दोन्ही मुली बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला. मात्र त्या न भेटल्यामुळे पालकांनी संध्याकाळी खेड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.
बारच्या वेटरला अटक
राजगुरुनगर येथील धनराज बारमधील वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आले. संशयित आरोपी हा ५० ते ५५ वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर गुन्हा गंभीर असल्याने पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिला. तपास सुरु असून खून का करण्यात आला? याची अजून कोणतीही माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली नाही.