Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

शिक्षण अधिका-यांनी दिलेला नकार आदेश न्यायालयाने रद्द केला. शाळेला मुलीच्या नावात आईचे नाव समाविष्ट करण्याचे आणि जात मराठा ऐवजी अनुसूबित जाती-महार अशी नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 21, 2026 | 05:17 PM
Aurangabad Bench Judgment

Aurangabad Bench Judgment

Follow Us
Follow Us:
  • एकल आईकडे वाढणाऱ्या मुलीच्या नोंदीत, ज्या वडिलांनी तिचा त्याग केला आहे किंवा ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, त्यांचे नाव ठेवणे मुलीवर अन्याय करणारे आहे.
  • पाल्य जर पूर्णपणे आईच्या संरक्षणात आणि संगोपनात असेल, तर त्या पाल्याला आईची जात आणि नाव मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
  • केवळ तांत्रिक कारणास्तव आईचे नाव आणि जात नाकारणाऱ्या प्रशासकीय भूमिकेवर न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले.
Aurangabad Bench Judgment: एकल आईकडे वाढणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या शालेय नोंदीत वडिलांचे नाव आणि जात कायम ठेवणे अन्यायकारक ठरते, असा महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार मुलीच्या शालेय नोंदीत आईचे नाव आणि तिची जात नोंदवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बीड येथील १२ वर्षीय मुलगी आणि तिच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने प्रशासनाच्या निर्णयावर ताशेरे ओढले. मुलीच्या जन्मावेळी वडिलांचे नाव आणि जात मराठा अशी नोंद करण्यात आली होती. मात्र संबंधित वडील हे आईवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असून नंतर झालेल्या तडजोडीनंतर त्यांनी मुलीशी कोणताही संबंध ठेवलेला नाही.

SE Reservation: तेलंगणाने करून दाखवले, महाराष्ट्र का पिछाडीवर? SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अमित गोरखे आक्रमक

सन्मानाने जगण्याचा हक्क महत्वाचा

या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. एकल आईकडे वाढणाऱ्या मुलीवर वडिलांची ओळख लादणे हे तिच्या सन्मानाला बाधा आणणारे ठरू शकते. समानतेचा अधिकार आणि भेदभावविरोधी तत्त्वे लक्षात घेता प्रशासनाने वास्तव परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. मुलाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही राज्याची जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाचे आदेश काय?

शिक्षण अधिका-यांनी दिलेला नकार आदेश न्यायालयाने रद्द केला. शाळेला मुलीच्या नावात आईचे नाव समाविष्ट करण्याचे आणि जात मराठा ऐवजी अनुसूबित जाती-महार अशी नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पुढे अधिकृत जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली असून, या प्रक्रियेदरम्यान मुलीला कोणलाही मानसिक त्रास किंवा सामाजिक कलंक सहन करावा लागू नये, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे.

Mumbai Central Park: महालक्ष्मी रेसकोर्सवरील ‘सेंट्रल पार्क’ वादाच्या भोवऱ्यात! १०२ वास्तुविशारदांचा भूमिगत

आईची याचिका

संबंधीत प्रकरणात मुलगी आईकडेच आहे. या परिस्थितीत आईने शाळेकडे अर्ज करून – मुलीच्या नावातील वडिलांचे नाव वगळून स्वत चे नाव समाविष्ट करण्याची आणि जात बदलण्याची मागणी केली होती. मात्र, शिक्षण अधिका-यांनी शालेय नियमांचा आधार घेत अर्ज फेटाळला, या कारणास्त याचिकाकर्तानी अॅड, संगमित्र वहमारे यांच्या बत्तीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने नमूद केले की, शालेय नोंदी या केवळ औपबास्कि न राहता त्या मुलाच्या ओळखीचा भाग असतात, बदललेल्या परिस्थितीत त्या वास्तवाशी सुसंगत करणे आवश्यक आहे. आई एकमेव पालक असल्यास मुलीची ओळख तिच्यावर आधारित असावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुलगी आईच्या समाजात वाढत असल्याने तिची जात आईप्रमाणे नोंदवणणे योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

 

Web Title: Single mothers daughter will get mothers name and caste aurangabad benchs historic decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Aurangabad Bench
  • Marathi News
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

हातमाग क्षेत्राचा कायापालट होणार! केंद्र सरकारकडून ‘हँडलूम हॅकेथॉन २०२६’ ची घोषणा; विणकरांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ
1

हातमाग क्षेत्राचा कायापालट होणार! केंद्र सरकारकडून ‘हँडलूम हॅकेथॉन २०२६’ ची घोषणा; विणकरांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ

Flight Ticket:  विंडो सीटसाठी जादा पैसे का? एअरलाईन्सच्या Seat Selection Fee चं संपूर्ण गणित
2

Flight Ticket: विंडो सीटसाठी जादा पैसे का? एअरलाईन्सच्या Seat Selection Fee चं संपूर्ण गणित

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च
3

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च

Share Market मध्ये थरथराट… डोनाल्ड ट्रम्प यांचा इशाऱ्याने मोठा फटका, सेन्सेक्स 1900 अंकांनी धडाम तर निफ्टीचे हाल बेहाल
4

Share Market मध्ये थरथराट… डोनाल्ड ट्रम्प यांचा इशाऱ्याने मोठा फटका, सेन्सेक्स 1900 अंकांनी धडाम तर निफ्टीचे हाल बेहाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.