Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

साताऱ्यात राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 02, 2026 | 02:47 PM
Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा
Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा
  • जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
  • सरकारला आंदोलनाचा इशारा
सातारा दि २ ( प्रतिनिधी): राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयाविरोधात सातारकरांच्या जनआक्रोश मोर्चाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सातारा जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात विविध संघटना, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.

आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत बसविण्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करण्यात आला. स्मार्ट मीटरचा खर्च भविष्यात वीजदरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार असून, ही योजना वीज क्षेत्राच्या खासगीकरणाकडे नेणारे पाऊल असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

निवेदनात वीज कायदा २००३ अंतर्गत ग्राहकांना मीटर निवडीचा अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे सध्या वापरात असलेले पोस्टपेड मीटर कायम ठेवावेत, स्मार्ट मीटरचे तांत्रिक तपशील, अचूकता चाचणी अहवाल, डेटा सुरक्षेचे धोरण, रिमोट डिस्कनेक्शनचे नियम, तक्रार निवारण यंत्रणा तसेच स्मार्ट मीटर सक्तीबाबतचा शासन निर्णय किंवा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) आदेशाची प्रत सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली.

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश

सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात अर्चना देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष समीर घाटगे, प्रदेश सरचिटणीस तेजस शिंदे, प्रदेश सचिव प्रविण धसके, नरेश देसाई, नागेश साळुंखे, आर. जी. तांबे, नंदाताई भिसे, निर्मला पाटील, सचिन जाधव, रोहित रोकडे, दयानंद नागटिळक, अमोल खुडे, असलम तडसरकर, श्रीरामकुमार पशी, नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील काळेकर, नेजपाल वाघ, तेजस जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, महादेव डोंगरे, रमेश पिसाळ यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, शहर सुधार समिती, सर्व श्रमिक कामगार संघटना आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही मोर्चात सहभाग नोंदवून स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सरकारने तातडीने निर्णय मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी केली.

Wai News: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!

Web Title: Smart meter compulsion protest satara ncp sharad pawar led morcha collector office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • mahavitaran
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
2

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
3

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना  आवाहन
4

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.