मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यातील सीमावाद पेटला आहे. मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके तसेच पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी आंदोलन करत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येत आहे. तर लोकांच्या संतप्त भावना व प्रतिक्रियांचा आगडोंब उसळला आहे. दरम्यान, यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर शेलक्या शब्दात टिका केली होती. तसेच सरकारचा नेभळट व षंढ असा उल्लेख केला होता. यावर सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
[read_also content=”चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना शिवसैनिकांकडून प्रतिकात्मक बांगड्याचा आहेर https://www.navarashtra.com/maharashtra/shivsainik-send-gift-symbolic-bangles-to-chandrakant-patil-and-shambhuraj-desai-border-issue-351660.html”]
दरम्यान, संजय राऊतांच्या या अशोभनीय शब्दांविरोधात भाजपा आता आक्रमक झाली आहे. राऊतांचा हा आक्रमकपणा थांबला नाही तर तुमच्या पत्रकार परिषदा होऊ देणार नाहीत, असा इशाराच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला आहे. तर दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांनी तोंड आवरावे अन्यथा पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागेल असं म्हटलं आहे. यावर राऊतांनी पलटवार करताना सत्य बोलणारे तुरुंगात जातील असा अर्थ होतो. सरकार काही करत नाहीय, म्हणून आता जनतेला काही तरी करावं लागेल. सरकार कायद्याची मोडतोड करतंय, बावनकुळें मास्तरांनी समजून सांगाव की माझ्या पत्रकार परिषदा ते बंद करणार आहेत का. तपास यंत्रणांवर भाजपाच दबाव आहे. भाजपाचे नेते न्यायालयाचे पुढे गेले आहेत. म्हणून ते सत्य बोलणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करताहेत. असं राऊतांनी पलटवार केला आहे.