
Solapur Crime News BJP MLA Sachin Kalyanshetti Firing Offer
Solapur Crime News : सोलापुरच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्कलकोट विधानसभा मदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाहनचालकाला कल्ल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्याची ऑफर देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे राजकीय तसेच पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील प्रसिद्ध महावीर चौक परिसरात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय खरेदीसाठी सोलापूर शहरात गेले होते. तर वाहनचालक आनंद सुरवसे हे गाडीजवळ थांबले होते. यावेळी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी हे दोघे संशयित वाहनचालकाजवळ आले. या दोघांनी सुरवसे यांना कल्ल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्याची ऑफर देत त्यासाठी बक्कळ पैसेही देतो, असल्याचे सांगितले.
दोघांनी दिलेली ऑफर ऐकून वाहनचालक आनंद सुरवसे हे देखील घाबरले. त्यानंतर सुरवसे यांनी या प्रकाराची माहिती कल्ल्याणशेट्टी यांना दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडेतक्रार दिली तपासाला सुरुवात केली आहे.या घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे, आमदारांना लक्ष्य करण्यामागील कारण काय आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयितांनी, आम्ही तुला भरपूर पैसे देतो, तु तुझ्या आमदार दादाला गोळ्या घालून मारुन टाक, यात तुझा मोठा फायदा असेल, आणि पुढचं काय ते आपण आम्ही बघुन घेऊ,” असं सांगितलं. संशयितांची ही ऑफर ऐकताच सुरवसे यांनी संशयितांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण पकडले जाण्याच्या भीतीने दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून तातडीने पळ काढला.
आरोपींनी पळ काढल्यानंतर सुरवसे यांनी तात्काळ सोलापुरातील सरद बाजार पोलीस स्टेशन गाठून घडल्या प्रकराची पोलिसांकडे तक्रार दिली. सुरवसे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी या दोघांविरोधात विविध गुन्हा दाखल केला आहे. आमदारांच्या सुरक्षेशी आणि हत्येच्या कटाचा प्रकार उघडकीस आल्याने पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.