Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

Nagpur Graduate Election : नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. पक्षाने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांच्या घरी गेले, मात्र सोले घरी नसल्याने भेट होऊ शकली नाही.

  • By विवेक
Updated On: Oct 05, 2026 | 09:57 PM
Ravindra chavhan anil sole

Ravindra chavhan anil sole

Follow Us
Follow Us:
  • भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अनिल सोले यांच्या घरी पोहोचले; मात्र भेट होऊ शकली नाही.
  • अनिल सोले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
  • सोले म्हणाले, “माघार घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आमचा निर्णय झालेला आहे.”
 

Nagpur Graduate Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस चालू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अश्यातच, नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपमध्येच अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते आउमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2026 आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

अनिल सोले यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नागपुरात त्यांच्या घरी पोहोचले. सोले हे पक्षाचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते असून उमेदवारी न मिळाल्याने ते काहीसे नाराज असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. सोले यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या घरी आलो असल्याचं चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. मात्र, चव्हाण घरी पोहोचले त्यावेळी अनिल सोले घरी नसल्याने दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही.

पुढील दोन-तीन दिवसांत पक्षातील वरिष्ठ नेते सोले यांची भेट घेतील आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. सोले पक्षासोबतची निष्ठा कायम ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

‘माघार घेण्याचा प्रश्नच नाही’; अनिल सोले स्पष्ट

दरम्यान, अनिल सोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्ते, पाठीराखे आणि गेल्या 25 वर्षांपासून या मतदारसंघातील शिक्षकांनी उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह केल्याने आपण अर्ज दाखल केल्याचं सोले यांनी सांगितलं. “माझा मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार आम्ही केला आहे,” असं त्यांनी म्हटलं.

तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षातील इतर नेत्यांना आपण गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका सांगितली असल्याचंही सोले यांनी स्पष्ट केलं.

“माघार घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आमचा निर्णय झालेला आहे. मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी निवडणूक लढवणार आहे,” अशी ठाम भूमिका अनिल सोले यांनी मांडली.

सुधाकर कोहळे विरुद्ध अनिल सोले?

भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी रिंगणात आहेत. त्यातच भाजपचे अनिल सोले अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याने निवडणुकीचं समीकरण चर्चेत आलं आहे.

रवींद्र चव्हाण यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा भाजप जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, सोले यांनी माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता 9 ऑक्टोबरपर्यंत ते उमेदवारी कायम ठेवतात का, याकडे लक्ष लागलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर असून मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे.

Nagpur Graduate Election: महायुतीत विधानपरिषद उमेदवारीवरून अंतर्गत वादाची ठिणगी;देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Web Title: Nagpur graduate election anil sole ravindra chavan bjp rebellion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • BJP
  • MLC Election
  • Nagpur News
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
1

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Dombivli News : रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत डोंबिवलीत नांदी संमेलन; AIपासून मराठी भाषेपर्यंत चर्चा
3

Dombivli News : रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत डोंबिवलीत नांदी संमेलन; AIपासून मराठी भाषेपर्यंत चर्चा

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
4

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.