Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारकडवाडी प्रकरणावरुन जिल्हाधिकाऱ्यांची मोठी माहिती; म्हणाले, EVM ठेवलेल्या गाड्यांना…

सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मारकडवाडी प्रकरणावरुन स्पष्टीकरण दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2024 | 02:26 PM
मारकडवाडी प्रकरणावरुन जिल्हाधिकाऱ्यांची मोठी माहिती; म्हणाले, EVM ठेवलेल्या गाड्यांना...

मारकडवाडी प्रकरणावरुन जिल्हाधिकाऱ्यांची मोठी माहिती; म्हणाले, EVM ठेवलेल्या गाड्यांना...

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मतदान आयोजित केले होते. मात्र, प्रशासनाने या मतदानास विरोध केला होता. कायदेशीरदृष्ट्या ही मागणी पूर्ण करता येणार नाही, असे सांगत प्रशासनाने ग्रामस्थांची ही मागणी धुडकावून लावली होती. एवढे होऊन देखील ग्रामस्थ ठाम होते त्यामुळे गावात जमावबंदी लागू करण्यात आली होती. यावर आता सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. म्हणाले, पोलिस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग सुरु करता येत नाही.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, 29 तारखेला मरकडवाडी ग्रामस्थांनी निवेदन दिले. ज्यामध्ये निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती केली. पण नियमानुसार केवळ निवडणूक आयोगाला आणि त्यांच्या वतीने प्रशासनाला अधिकार आहेत. बाकी कोणाला कोणत्याही कायद्यानुसार अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे निवेदन अमान्य करण्यात आले. तरी देखील ग्रामस्थांनी स्वतः मतदान करण्याचा निर्णय घेतला. आम्ही 2 ते 5 डिसेंबर पर्यंत जमावबंदी लागू केली होती. त्याचे उलंघन केले म्हणून 89 लोकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत.

पुढे बोलताना कुमार आशीर्वाद म्हणाले, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाहीत. जर ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात. पण स्वतः असा मतदान घेता येणार नाही. पोलिस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा फोर्स सुरु करता येत नाही. त्याच पद्धतीने स्वतः असे मतदान घेता येणार नाही.

हे सुद्धा वाचा : इंदापुरातील तरंगवाडीत चक्क ईव्हीएमची घोड्यावरुन मिरवणूक; मशीनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी

ईव्हीएम मशीन ज्या गाडीतून नेण्यात आले त्या गाडीना जीपीएस होते. इतकेच नाही तर ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाड्यांना फॉलो करण्याची मुभा देखील होती. विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी समोर हे मशीन अकलूज गोडाऊनमध्ये ठेवले. 9 तारखेला ईव्हीएम मशीन पेअरिंग केली, तेव्हा देखील राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते, असे कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

पुढे कुमार आशीर्वाद म्हणाले, 11 तारखेला कमिशनिंग झाले तेव्हा उत्तम जानकर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 20 नोव्हेंबरला मतदान झाले, मारकडवाडीमध्ये तीन केंद्र आहेत. 96 नंबर बूथ मध्ये 4 पोलिंग एजंट उपस्थित होते. 97 नंबर मध्ये 4 पोलिंग एजन्ट, 98 मध्ये 3 उपस्थित होते. यामध्ये ज्यांनी आक्षेप घेतलेत त्यांचे प्रतिनिधी देखील मॉक पोल वेळी उपस्थित होते. मॉक पोल सर्टिफिकेट आम्ही घेतो तेव्हा पोलिंग एजंटचे सही आम्ही त्यांच्यावर घेतो, या एजंटनी सही केलेली आहे, असे स्पष्टीकरण आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Web Title: Solapur collector kumar ashirwad has given an explanation on the markadwadi case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 02:05 PM

Topics:  

  • BJP
  • Election
  • maharashtra

संबंधित बातम्या

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी
1

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार
2

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
3

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
4

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.