
Maharashtra Politics, BJP, Shiv Sena, Mahayuti, MLC Elections,
राज्यातील पाच विधान परिषद जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालांनुसार, विरोधी महाविकास आघाडीने (MVA) पाचपैकी तीन जागा जिंकल्या, तर सत्ताधारी महायुतीने दोन जागा मिळाल्या. यावरून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बान यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक खळबळजनक पोस्ट शेअर करून, आपले मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण झाले आहे.
Amravati News: शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक विजयी; मिळाली ११,४८१ मते
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निकालांचे विश्लेषण करताना नवनाथ बान यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकीदरम्यान महायुतीचा भाग असूनही, शिवसेनेने पुणे आणि नागपूरमध्ये अपेक्षित पाठिंबा दिला नाही, असंही म्हटलं आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.
शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही.
याव्यतिरिक्त, छत्रपती संभाजीनगरचा संदर्भ देत नवनाथ बान यांनी शिवसेनेचे प्रमुख नेते अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) विरोधात उघडपणे प्रचार केला. आपल्याच मित्रपक्षाच्या विरोधात अशा प्रकारचा प्रचार महायुतीसाठी हानिकारक ठरला.
भाजपच्या प्रवक्त्याने खंत व्यक्त केली की, जर शिवसेनेने युतीच्या तत्त्वांचे आणि तत्त्वांचे प्रामाणिकपणे पालन केले असते आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससोबत समन्वय साधून निवडणुकीच्या रिंगणात उतरली असती, तर महायुतीला पाचही जागांवर ऐतिहासिक विजय मिळवता आला असता.
‘त्या’ शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेलाही कोणी जाऊ नये; आमदार संजय गायकवाड यांचे ‘ते’ विधान चर्चेत
पुण्यातील एका जागेसाठीच्या पाठपुराव्यात शिवसेनेने आपल्याच मित्रपक्षांसाठी अडचणी निर्माण केल्या. याचा परिणाम म्हणून युतीला सहज जिंकता येण्यासारख्या तीन जागा गमवाव्या लागल्या. मित्रपक्षांना डावलून एका जागेला प्राधान्य देणे हे महायुतीच्या हिताचे नाही, अशी टिकाही नवनाथ बान यांनी उपरोधिक टिका केली आहे.
नवनाथ बान यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यावर कशी प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: नवनाथ बान यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने युतीधर्म न पाळल्याचा व महायुतीच्या उमेदवारांविरोधात काम केल्याचा उघड आरोप केला आहे.
Ans: छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात उघडपणे प्रचार करून मित्रपक्षाला फटका पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Ans: स्थानिक पातळीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्ट झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमधील जागावाटप व प्रचारात महायुतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.